kankavali police arrested 20 while gambling saam tv
महाराष्ट्र

चर्चाच चर्चा! जुगार अड्ड्यावरील छाप्यात ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेले वाहन जप्त

यापैकी काहींना राजकीय वरदहस्त असलेली मंडळी असल्याची चर्चा कणकवलीत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

कणकवली : कणकवली (kankavali) पोलिसांनी (police) निमेवाडी उचवळे येथे नदीकिनारी एका ठिकाणी जुगार (gambling) खेळत असताना २० जणांना पकडले. पाेलिसांनी टाकलेल्या धाडीत ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेल्या एका चार चाकीसह १२ दुचाकी, एक रिक्षा तसेच एक चार चाकी तसेच एक लाख २४ हजारांची रोख रक्कम असे सुमारे २३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली (kankavali latest marathi news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या कारवाईत २० संशयितांवर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी काहींना राजकीय वरदहस्त असलेली मंडळी असल्याची चर्चा कणकवलीत आहे.

ही कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ, कैलास इपाळ, बाळू गुरव, रुपेश गुरव, चंद्रकात माने, किरण मेथे, चंद्रकात झोरे, पांडुरंग पांढरे, दाजी सावंत, किरण कदम व पथकाने केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT