Kangna Ranaut Podcast Saam tv
महाराष्ट्र

Kangana Ranaut Statetment : खासदार होऊन आनंदी नाही, रस्ते-गटारे यांच्या तक्रारी येतात, कंगना रणौत यांचं धक्कादायक वक्तव्य

Kangna Ranaut Podcast : कंगना राणौत यांनी एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक विधान केलं आहे. त्यांनी म्हटले की, त्यांना राजकारणात फारसे समाधान नाही. पंतप्रधान होण्याची इच्छाही नाही. हे क्षेत्र त्यांच्या आवडीचं नाही आणि त्या फार काळ यामध्ये राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

Alisha Khedekar

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजपा खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये राजकीय प्रवासाबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. खासदार होण्यामध्ये आनंद नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कंगना यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

कंगना यांनी 'आत्मान इन रवी ' (एआयआर) या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टमध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगितले . मार्च २०२४ मध्ये कंगना भाजपमध्ये सामील झाल्या. कंगना यांनी खुलासा केला की, त्यांना राजकारणात येण्याची ऑफर मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांना ते आवडतंय का असं विचारलं असता, त्या म्हणाल्या, "मला ते जमतंय. मी असं म्हणणार नाही की, मला ते आवडतंय. हे एक वेगळ्या प्रकारचे काम आहे, ते समाजसेवेसारखे आहे.

ही माझी पार्श्वभूमी नाही. मी कधीही लोकांची सेवा करण्याचा विचार केला नाही. मी महिलांच्या हक्कांसाठी लढले आहे, पण ते वेगळं आहे. कोणीतरी येऊन म्हणत की,माझं गटार तुटलं आहे . आणि मी त्यांना म्हणते, 'पण मी खासदार आहे आणि या पंचायत पातळीवरील समस्या आहेत'. पण ते म्हणतात, 'तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही स्वतःचे पैसे वापरा'"

पंतप्रधान होण्याच्या प्रश्नावर काय म्हणाल्या कंगना ?

कंगना यांनी पॉडकास्टमध्ये हे देखील स्पष्ट केलं की, त्यांना भविष्यात पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. त्या म्हणाल्या,"मी नेहमीच महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. परंतु हे काम त्यापेक्षा वेगळं आहे. मला वाटत नाही की राजकीय क्षेत्रात मी जास्त काळ काम करेन. तेवढा संयम आणि आवड नाही. मला वाटत नाही की मी पंतप्रधान या भूमिकेसाठी पुरेशी सक्षम आहे. कारण सामाजिक कार्य ही माझी पार्श्वभूमी कधीच नव्हती. मी खूप स्वार्थी प्रकारचे जीवन जगली आहे".

कंगना रणौत यांचा राजकीय प्रवास

कंगना राणौत यांनी भाजप मधून निवडणूक लढवली आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मंडी मतदारसंघातून विजय मिळवला. मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना यांनी त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंह यांच्यावर ७४,७५५ मतांनी विजय मिळवला. विजयानंतर दुसऱ्याच दिवशी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ अधिकाऱ्याने त्यांच्या कानशिलात मारली. या घटनेनंतर त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना खात्री दिली की त्या सुरक्षित आहे आणि कोणतीही हानी झालेली नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT