कंगना रणौत सध्या त्यांच्या इमर्जन्सी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. कंगना यांच्या इमर्जन्सी चित्रपटाची सर्व चाहत्यांना उत्सुकता लागलीय. कंगना यांनी या चित्रपटामध्ये 'दिवंगत पंतप्रधान इंदिरा गाधी' यांची मुख्य भूमिका साकारलीय. काही दिवसापूर्वी चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणांमुळे चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. सेन्सर बोर्डच्या या निर्णयामुळे कंगना रणौत चांगल्याच संतापलेल्या होत्या. 'इमर्जन्सी' हा चित्रपट कंगना यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि खास चित्रपट आहे. या चित्रपटाची घोषणा २०२४च्या सुरुवातीला करण्यात आली होती. चित्रपटाची घोषणा होताच अनेक चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झालीय.
काही दिवसांपूर्वी कंगना यांनी एक मोठा निर्णय घेतला. कंगना यांचा वांद्रे पाली हिल येथील बंगला त्यांनी विकण्याचा निर्णय घेतला. कंगना यांनी हा बंगला 32 कोटी रुपयांना विकला आहे. परंतु, असं काय घडलं ज्यामुळे कंगना यांनी हा बंगला का विकला? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडलाय. कंगना यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खरं कारण सांगितलं.
मुलाखातीत कंगना म्हणाल्या की, " या वर्षी माझा इमर्जन्सी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटासाठी माझी खासगी मालमत्ता गुंतवली होती. आता ती जागा सोडावणं कठीण झालं आहे. असो ही मालमत्ता संकट काळासाठीचं असते." कंगना यांच्या वांद्र्यातील पाली हिल्समध्ये बंगल्यावर बीएमसीने बुलडोझर चालवला होता. हा बंगला कंगना यांनी २०१७ मध्ये २० कोटींना विकत घेतला होता. २०१९मध्ये या बंगल्यामध्ये मणिकर्णिका या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर बीएमसीकडून बंगल्याचा बेकायदेशीर भाग पाडला होता. या तोडफोडीच्या भरपाईची मागणी कंगना यांच्याकडून करण्यात आली होती. कंगना यांनी अंधेरीमध्ये १.५६ कोटींचं ऑफिस विकत घेतलं आहे.
कंगना यांचा 'इमर्जन्सी' चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता मात्र सेन्सर बोर्डकडून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. कंगना यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलला आहे असे सांगितले. चाहत्यांमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम आहे. या चित्रपटामध्ये कंगना यांच्यासोबत 'मिलिंद सोमन' आणि 'श्रेयस तळपदे' देखील झळकणार आहे.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.