kamlapur elephant camp will be closed for next twelve days saam tv
महाराष्ट्र

Kamlapur Elephant Camp : हत्तींना वैद्यकीय रजा, कमलापूरचा हत्ती कॅम्प 12 दिवस राहणार बंद

12 दिवस चालणाऱ्या या चोपिंग मध्ये हत्तींचे विशेष काळजी केले जाते. त्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केले जाते असे डॉ. महेश येमचे यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News :

राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प (kamlapur elephant camp) येथील हत्तींना बारा दिवसांची वैद्यकीय रजा देण्यात आली आहे. यामुळे पुढील 12 दिवस कमलापूर हत्ती कॅम्प बंद राहणार आहे.  (Maharashtra News)

गडचिरोली जिल्हातील सिरोंचा वन विभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्र आहे. येथे अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी असे आठ हत्ती आहेत. वाढत्या थंडीमुळे या हत्तींच्या तळपायाला भेगा पडताहेत. त्यांना चालताना त्रास जाणवल्याचे वन विभागाच्या अधिका-यांच्या लक्षात आले.

या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी आठही हत्तींना बारा दिवसांची वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. सुमारे 10 दिवसांत हत्तींच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापुर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. सध्या हा हत्ती कॅम्प 12 दिवसांसाठी बंद राहणार आहे अशी माहिती नरेश चोके, वन परीक्षेत्र आधिकारी कमलापुर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT