kalyanrao kale, sahakar shiromani vasantrao kale sahakari sakhar karkhana  saam tv
महाराष्ट्र

Vasantrao Kale Sugar Factory News : वसंतराव काळे साखर कारखाना अध्यक्षपदचा कार्यभार घेताच कल्याणराव काळे म्हणाले...

या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या (Sahakar Shiromani Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे यांची तसेच उपाध्यक्षपदी भारत कोळेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. (Maharashtra News)

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासाठी सत्ताधारी कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (ncp abhijeet patil), डॉ. बी. पी. रोंगे, दीपक पवार यांनी एकत्रित येत आव्हान दिले होते.

अत्यंत चुरशीने झालेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कल्याणराव काळे यांनी आपली काखान्यावरील २२ वर्षांची सत्ता कायम राखली.

आज (pandharpur) या साखर कारखानाच्या पदाधिका-यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये कल्याणराव काळे यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. दरम्यान या निवडीनंतर कल्याणराव काळे यांनी कारखान्याचे सभासद आणि कामगारांची थकित देणी दिल्याशिवाय सत्कार, हार तुरे स्विकारणार नसल्याचे काळे यांनी जाहीर केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT