Kalyan News  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : चाललंय काय? आगार व्यवस्थापकाने CNG पंपासमोर फटाके फोडले, रस्त्यावरच बर्थडे सेलिब्रेशन

Kalyan News : विठ्ठलवाडीतील बस आगार व्यवस्थापकाने CNG पंपाजवळ फटाके फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरानंतर कारवाईची मागणी होत आहे.

Vishal Gangurde

विठ्ठलवाडी बस आगारात व्यवस्थापकाने सीएनजी पंपासमोर फोडले फटाके

कारच्या बोनटवर केक कापत बर्थडे सेलिब्रेशन

नागरिकांकडून बेफिकीर वर्तनाबद्दल संताप व्यक्त

पोलिसांकडे कारवाईची मागणी सुरू

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : सार्वजनिक सुरक्षेची काळजी न घेता विठ्ठलवाडी बस आगारात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आगार व्यवस्थापकानेच सीएनजी पंपाशेजारीच फटाके फोडत, स्वतःच्या कारच्या बोनटवर केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बेफिकीर प्रकारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

घटनास्थळाजवळच सीएनजी पंप असल्याने कोणत्याही क्षणी मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, तरीही जबाबदार अधिकाऱ्याने नियम धाब्यावर बसवत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रवासी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सार्वजनिक स्थळी, विशेषतः सीएनजी पंपाजवळ अशा प्रकारचा उत्सव साजरा करणे अत्यंत धोकादायक असल्याने प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करते, हे पाहावे लागेल.

कल्याण पूर्वेत अल्पवयीन तरुणांचा धिंगाणा

कल्याण पूर्व परिसरात अल्पवयीन मुलांच्या बेधुंद धिंगाण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. परिसरतील काही अल्पवयीन तरुणांनी कारवर बसून दारूच्या बाटल्या हातात घेत नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकारानंतर स्थानिक रहिवाशांनी अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केलीये. व्हिडिओच्या आधारे मुलांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Rules : पीएफ वाढणार, पण हातात येणार पगार कमी होणार, नव्या कामगार कायद्यामुळे CTC चं गणित बदलणार

Yellow Batata Bhaji: उकडलेल्या बटाट्याची पिवळी झणझणीत भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : मुंबईच्या माहीम पूर्व झोपडपट्टी परिसरात मोठी आग

Siddhanth Kapoor: बॉलिवूडवर पुन्हा ड्रग्जचं सावट; २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला समन्स

Solapur Accident : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, सोलापूरमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू, गाडीचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT