कल्याणमध्ये रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून रिलस्टारचा मृत्यू
रीलस्टार प्रेमभाटी याच्या अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर
रीलस्टारच्या अपघाती मृत्यूने चाहत्यांमध्ये हळहळ
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमध्ये रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे झालेल्या अपघातात रीलस्टार प्रेम भाटी याचा मृत्यू झाला. प्रेम भाटीचा शनिवारी पहाटे तीन वाजता अपघात घडला होता. रीलस्टार प्रेम भाटीच्या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय.
प्रेम भाटी दुचाकीवर जात असताना रस्त्यावर पडलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी उडताना दिसत आहे. रात्रीची वेळ असल्याने प्रेम भाटिया रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना हा प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली आहे. या अपघाताचा कल्याण खडकपाडा पोलीस तपास करत आहेत. तसेच प्रेम भाटीच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.
प्रेमची दुचाकी रस्त्यावरील खडीमुळे घसरली. त्यानंतर त्याचा रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे अपघाती मृत्यू झाला.अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
प्रेम भाटीच्या अपघाती मृत्यूनंतर रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच रस्ते दुरुस्ती आणि देखभालीतील हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
प्रेम भाटी हा सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्याच्या अपघाताचे नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू केला होता. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर प्रेम भाटीच्या अपघाताचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. अपघाताचा सीसीटीव्ही आढळल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.