Rain Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, ५ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather: राज्यात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ५ जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
Rain Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, ५ जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra WeatherSaam Tv
Published On
  • महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

  • ५ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

  • रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर मुसळधार पावसाचा अंदाज

  • महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली तर काही ठिकाणी धोधो पाऊस पडत आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे आता बळीराजा चिंतेत आला आहे. आज राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळतील. तर जळगावव, धुळे, सोलापूर, जालना, संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड आमि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यामध्ये श्रावण सरी कोसळण्याचा अंदाज आहे. याठिकाणी ऊन पावसाचा खेळ सुरू राहिल.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालाच लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किमीमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. अशामध्ये हे क्षेत्र आज अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पावसाचावर होताना पाहायला मिळत आहे.महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट

  1. रायगड रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर मुसळधार पावसाचा अंदाज

  2. महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

  3. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रातील पावसावर परिणाम

  4. घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी पाच जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com