Kalyan  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कल्याणचा स्कायवॉक फेरीवाल्यांनी गिळला; प्रशासन मूग गिळून गप्प, कारवाई करणार की नाही?

Kalyan News : कल्याणचा स्कायवॉक फेरीवाल्यांनी गिळल्याचं दिसत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरीही प्रशासनाने मौन बाळगलं आहे.

Vishal Gangurde

कल्याण स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण

केडीएमसी आणि रेल्वे प्रशासन जबाबदारी एकमेकांवर ढकलतेय

नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रवासी संघटनांनी पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची मागणी

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरातील महत्त्वाचा प्रवासी मार्ग मानल्या जाणाऱ्या स्कायवॉकवर पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढू लागले आहे. रस्ते, फुटपाथ आणि स्कायवॉकमधील मोकळ्या जागांवर फेरीवाले बिनधास्तपणे स्टॉल लावत असल्याने प्रवाशी, पादचारी नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन स्कायवॉकवरून मार्ग काढावा लागत आहे.

स्कायवॉकवर अवैध स्टॉल, कपड्यांचे दुकान, खाद्यपदार्थ विक्रेते, बनियन-टीशर्ट विक्रेते अशा अनेकांनी जवळपास अर्धा मार्ग व्यापल्याने संध्याकाळी आणि सकाळच्या गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांची दाटी वाढते. धक्काबुक्की, चोरीचे प्रकार, महिलांना होणारा त्रास आणि अपघाताचा धोका यामुळे नागरिकांना नियमित कारवाईचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात स्कायवॉकवरील अतिक्रमण कायम आहे. शहरातील व्यापारी आणि स्थानिक नागरिकांच्या मते, केडीएमसी, रेल्वे प्रशासन आणि पालिका अतिक्रमण विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे.

स्कायवॉक प्रवाशांसाठी बांधल गेले आहे पण आज तो फेरीवाल्यांचाच झालाय,अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. गर्दीच्या वेळी स्कायवॉकवरून चालणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. फेरीवाल्यांच्या हिशोबी मांडवळीमुळे पादचारी मार्ग अर्धा कमी होतो. यावर तातडीने कारवाईची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. नागरिक, सामाजिक संघटना आणि प्रवासी संघटनांनी देखील अनेकदा लेखी तक्रारी दिल्या असूनही ठोस कारवाई दिसत नाही.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्कायवॉकवरील अतिक्रमण हटवून स्वच्छ, सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. प्रशासनाने आता तरी याकडे गांभीर्याने पाहून तातडीने संयुक्त कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगाव मध्ये मोठी घडामोड; अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार

Tuesday Horoscope : शत्रूंचा पाडाव करणार, प्रेमात यश मिळेल; ५ राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

SCROLL FOR NEXT