Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : दोन सराईत चोरटे ताब्यात; १२ लाखाचे दागिने हस्तगत, कोळशेवाडी पोलिसांची कारवाई

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कोळशेवाडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या या चोरट्यांकडून पोलिसांनी (Police) तब्बल १२ लाखाचे दागिने गस्तगत केले असून ताब्यात (Kalyan) घेतलेल्या संशयित आरोपीच्या वडील, भाऊ व वहिणी यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

कोळशेवाडी (Kodsewadi) पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राजेश राजभर, राहुल घाडगे अशी दोन चोरट्यांची नावे आहेत. राजेश राजभर विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील पोलिस ठाण्यात ३० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये (Crime News) वाढ झाली होती .या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे, पोलीस अधिकारी दिनकर पगारे, पोलीस अधिकारी मदने, सुशील हांडे, सुरेश जाधव, सचिन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. खबऱ्यांनी दिलेली माहिती व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विठ्ठलवाडी बस डेपोजवळ रचलेला सापळ्यात सराईत चोरटा राहुल घाडगे याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांना बघून राहुल गाडगे पळून जात होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. राहुल गाडगे विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. याच दरम्यान कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करण्यात सराईत असलेला राजेश राजभर हा उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उत्तर प्रदेश आजमगड येथील लालगंज परिसरात वेशांतर करून सापळा रचला व त्या ठिकाणाहून राजेश राजभर याला बेड्या ठोकल्या. कोळशेवाडी पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून चार गुन्ह्यांची उकल करत दहा लाखांचे दागिने हस्तगत केले. तपासा दरम्यान धक्कादायक बाब समोर आली. राजेश चोरी केलेले दागिने त्याच्या परिवारातील त्याचे वडील, भाऊ व वहिनी यांच्या मार्फत सोनारांना विक्री करत होता व आलेल्या पैशातून त्याचे कुटुंब उपजीविका करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT