Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक; आंबिवलीच्या इराणी वस्तीतील घटना, एक पोलीस जखमी 

Kalyan News : इराणी वस्तीच्या परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे याठिकाणी पोलिसांचे पथकच जात असते.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : चोरीच्या घटनेत संशयित असलेल्या चोरट्याला पोलिसांनी इराणी वस्तीतून ताब्यात घेतले होते. चोरट्याला घेऊन परतत असताना इराण्यांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. हा प्रकार कल्याण जवळील आंबिवलीतील इराणी वस्तीत घडला असून या दगडफेकीत एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. 

इराणी वस्तीच्या परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे याठिकाणी पोलिसांचे पथकच जात असते. मात्र कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीत बुधवारी रात्रीच्या सुमारास इराण्यांनी पुन्हा एकदा पोलीस पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास मुंबई एमआयडीसी पोलिसांनी तौफिक नावाच्या चोरट्याला इराणी वस्तीतून ताब्यात घेतले होते. 

इराणी वस्तीतून तोफिकला ताब्यात घेऊन काही अंतरावर पोलीस गेले असतानाच अचानक इराणी जमावाने विरोध करत पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. अचानक दगडफेक झाल्याने पोलिसांनी थेट आंबिवली रेल्वे स्थानक गाठले. मात्र या इराणी जमावाने पोलिसांचा पाठलाग करत रेल्वे स्थानकात देखील पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.  

दरम्यान पथकावर झालेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी यशवंत पालवे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलिसाला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू केला आहे. यापूर्वीही इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ले झाल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

SCROLL FOR NEXT