धुळे : सहा महिन्यांपूर्वी मुलीचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान मुलीचे अपहरण करणाऱ्यांनी तिच्या कुटुंबियांना देखील त्रास दिला. या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यात घडली आहे. दरम्यान कुटुंबीयांनी पोलिसांवर देखील आरोप केले आहे.
लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचे मोठ मोठे आश्वासन राज्यकर्त्यांतर्फे दिले जात असताना दुसरीकडे मात्र शिंदखेडा तालुक्यातील आक्कडसे गावातुन सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. इतकेच नाही तर अपहरणकर्त्यांकडून मुलीच्या कुटुंबीयांना देखील मारहाण करत धमकविले जात होते. वारंवार हा त्रास होत असल्याने अखेर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली आहे.
पोलीस प्रशासनावर आरोप
पोलीस प्रशासनातर्फे या प्रकरणाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी लावला आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असताना पोलीस प्रशासनातर्फे प्रकरणाचा तपास केला जात नसल्याची देखील खंत पीडित कुटुंबीयंतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. तर अपहरणकर्त्या नराधमांच्या कुटुंबीयांतर्फेच अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण करून वेळोवेळी त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील पीडित कुटुंबियांनी लावला आहे.
आतातरी न्याय मिळेल का?
तर त्रासाला कंटाळूनच मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा गंभीर आरोप देखील लावला आहे. या सर्व प्रकारानंतर पोलीस प्रशासन आता तरी या प्रकरणाला गांभीर्याने घेणार का? आणि अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा थांग पत्ता लावून आरोपींना गजाआड केलं जाईल का? हे बघणं औचित्याचा ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.