Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : शाळेत कधीपर्यंत राहणार, आमचे पुनर्वसन करा; सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांचा केडीएमसीत पायी मोर्चा

Kalyan News : कल्याण पूर्वेकडील चिकणी पाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण जखमी तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केडीएमसीने ही संपूर्ण इमारत रिकामी केली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्वेकडील सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब कोसळून यात सहा जणांना मृत्यू झाल्याची दुर्घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांनी आज पायी चालत तिसगाव ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या रहिवाशांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. 

कल्याण पूर्वेकडील चिकणी पाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण जखमी तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केडीएमसीने ही संपूर्ण इमारत रिकामी केली. केडीएमसीकडून या इमारतीमधील रहिवाशांचे कल्याण पूर्वेकडील शाळांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र या रहिवाशांनी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी करत हातात सप्तशृंगीचे फलक घेत पायी चालत तिसगाव ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. 

बोलताना अश्रू अनावर 

दरम्यान मोर्चात सहभागी झालेल्या रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केला. इतक्या वर्ष पहिले जमवून आम्ही संसार जमवला. दहा-पंधरा मिनिटात एवढा संसार कसा रिकामा करणार. निदान आम्हाला आमचा सामान काढण्यासाठी तरी वेळ द्या. आजचा तिसरा दिवस आहे. मात्र आम्ही बाहेर पडलो. आमची तात्पुरती व्यवस्था शाळेमध्ये केली आहे. मात्र शाळेत कधीपर्यंत राहणार? निदान पावसाळ्यापर्यंत आम्हाला तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा अशी मागणी पाणावलेल्या डोळ्यांनी केली. 

केडीएमसी अधिकाऱ्यांची घेतली भेट 

आमची इमारत धोकादायक आहे. इमारत निष्कासित केल्यानंतर आम्ही कुठे जाणार. आमचं पुढे काय होणार? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला. शासनावर केडीएमसीवर न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आमचं पावसाळ्यापुरतं तात्पुरतं पुनर्वसन करा अशी मागणी या रहिवाशांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत केली. यावेळी गायकवाड यांनी मागण्यांबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT