अमळनेर (जळगाव) : फिरण्यासाठी गेलेल्या दोघं मित्रातील एकाचा पाय घसरून तलावाच्या पाण्यात पडला. मित्र बुडत असल्याचे पाहून काहीही विचार न करता थेट तलावात उडी आपल्या मित्राला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात गाळात बुडल्याने एकाच मृत्यू झाला. सदरची घटना धुळे येथील अवधान एमआयडीसी तलावात घडली.
धुळे येथील अवधान एमआयडीसी येथे घडलेल्या घटनेत इन्साफ खान याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इन्साफ खान हा १९ मे रोजी मित्र मयूर गांगुर्डे याच्यासोबत धुळे येथील अवधान एमआयडीसी तलावाकडे फिरायला गेला होता. तलावाकाठी फिरत असताना अचानक मयूरचा पाय घसरला आणि मयूर पाण्यात बुडू लागला. क्षणाचाही विलंब न करता इन्साफने पाण्यात उडी मारली. त्याने मयूरला पाण्यातून बाहेर काढले.
बाहेर निघता न आल्याने तो बुडाला
मित्राला बाहेर काढल्यानंतर इन्साफ मात्र गाळात अडकला. त्याला यातून बाहेर निघता येत नसल्याने बाहेर येण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू झाला मात्र तो गाळात बुडाला. याच वेळी परिसरात असलेल्या काही नागरिकांनी तलावात उडी मारत इन्साफला बाहेर काढले. परंतु त्याच्या नाकातोंडात गाळ गेल्याने त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात पाठविले.
उपचारादरम्यान मृत्यू
यानंतर इन्साफला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र २० मे रोजी सकाळी इन्साफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. इन्साफ हा मूळचा राजस्थान येथील होता. अमळनेरला भाड्याने घर घेऊन आई- वडिलांसह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह निश्चित झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.