Unseasonal Rain : वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान; संत्र्याची झाडे उन्मळून पडली, आंब्याचेही मोठे नुकसान

Nagpur News : नागपूरच्या नरखेड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने कहर केला आहे. रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने नुकसान केले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा सुरु आहे. वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसानीची झळ बसत आहे. प्रामुख्याने वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २० मे रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे संत्रा, आंबा फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संत्र्याची झाले उन्मळून पडली आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नागपूरच्या नरखेड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने कहर केला आहे. रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने नुकसान केले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील १५ - २० वर्षाची झाडे मुळासहित जमीनदोस्त झाली आहेत. तर अल्प प्रमाणात असलेली आंब्या बहरच्या संत्रा पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात गळली लागली आहे. 

Unseasonal Rain
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये खळबळ; एकाची दगडाने ठेचून हत्या, चोवीस तासात दुसरी घटना

कारंजा तालुक्यात मोठा फटका 
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील जानोरी भिंगारे, पानगव्हाण तसेच काजळेश्वर येथे २० मे रोजी संध्याकाळी चक्रीवादळ सदृश वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. चक्रीवादळ सदृश वाऱ्यामुळे संत्र्याच्या बागांवर परिणाम झाला असून अनेक झाडे मुळासकट उद्ध्वस्त झाली. यामधे शेतकऱ्यांचे फळ पीकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटसमयी शासनाने नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

Unseasonal Rain
Sambhajinagar Crime : संभाजीनगरात सशस्त्र दरोडा; गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

दक्षिण सोलापूरमध्ये आंब्याचे नुकसान 
सोलापूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चांगलाच चिंतेत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावातील हरिदास जमादार यांच्या केसर आंब्याचे ५ ते ७ लाखांचे नुकसान झाले आहे. मनगोळी गावात अवकाळी पावसामुळे एकाच शेतकऱ्याच्या अडीचशे ते तीनशे केसर आंब्याच्या झाडांना फटका बसला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com