Latur Crime : लॉजवर सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय; छापा टाकत पोलिसांची कारवाई, सात जण ताब्यात

Latur News : लॉजचे मालक व व्यवस्थापक तसेच त्यांचे साथीदार हे परराज्यातील महिलांना लॉजवर आणून एजंटमार्फत ग्राहक आणून देहविक्रीचा व्यवसाय चालवीत होते याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली
Latur Crime
Latur CrimeSaam tv
Published On

लातूर : लातूर शहरातील शिवाजी रोडवरील स्क्रॅप मार्केट परिसरात असलेल्या एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु होता. याठिकाणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून तीन फरार झाले आहेत. तसेच याठिकाणाहून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे. 

लातूर शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या स्क्रॅप मार्केट परिसरात असलेल्या आनंद लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात होता. तर लॉजचे मालक व व्यवस्थापक तसेच त्यांचे साथीदार हे परराज्यातील महिलांना लॉजवर आणून एजंटमार्फत ग्राहक आणून देहविक्रीचा व्यवसाय चालवीत होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानंतर मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. 

Latur Crime
Sambhajinagar Crime : संभाजीनगरात सशस्त्र दरोडा; गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

बनावट ग्राहक पाठवून टाकला छापा 

छापा टाकताना पोलिसांनी सदर लॉजवर बनावट ग्राहक पाठविला. पोलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच पथकाने लॉजवर छापा टाकला. सदर छाप्यात परराज्यातील दोन महिला मिळून आल्या. या दोन्ही महिलांची सुटका करण्यात आली. तर लॉज व्यवस्थापक व इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच याप्रकरणी दहा जणावर गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Latur Crime
Amalner news : मित्राला वाचविण्यात जीव गमावला; गाळात बुडाल्यामुळे तरुणाचा मृत्यू

लातूरमध्ये खळबळ 

दरम्यान लातूर शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या परिसरातील लॉजवर पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली आहे. सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून तिघेजण फरार आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या मागे आणखी काही मोठे रॅकेट आहे का? याचा तपास पोलीसांकडून सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com