Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : रोषणाईसाठी मीटरमधून घेतलेले कनेक्शन काढले; तिघांनी केली बेदम मारहाण

Kalyan News : मीटरमधून ईद ए मिलादच्या निमित्ताने विजेचे कनेक्शन घेऊन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा सण संपला तरी विद्युत रोषणाई सुरुच होती.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: ईद ए मिलादनिमित्त शेजारी राहणाऱ्याच्या वीजमीटर मधून विद्युत रोषणाई केली. यामुळे वीज बिल जास्त वाढल्याने शेजाऱ्याने हे कनेक्शन काढून टाकले. या कारणावरून विद्युत रिषणाई करणाऱ्या तिघांनी मिळून शेजाऱ्याला बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेत उघडकीस आला असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कल्याण (Kalyan) पूर्वेतील सूचक नाका परिसरात फैजू चाळीत राहणारे नौशाद खान यांच्या लाईट मीटरमधून ईद ए मिलादच्या निमित्ताने विजेचे कनेक्शन घेऊन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा सण संपला तरी विद्युत रोषणाई सुरुच होती. त्यामुळे नौशाद यांचे वीजबिल वाढले. तर जास्त लोड आल्याने नौशाद यांचा लाईट मीटर जळाला. त्यामुळे नौशाद यांनी त्यांच्या वीजमीटर मधून घेण्यात आलेले रोषणाईचे कनेक्शन काढले. याचा राग मनात धरुन परिसरातील नौशाद खान यांना जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला.

याच वादातून तीन तरुणांनी नौशाद यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत नौशाद खान हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी नौशाद यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन मारहाण करणाऱ्या खुर्शीद शेख, आलम शेख, तौहीद सैय्यद या तिघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT