हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

Bharat Jadhav

कारण काय ?

लांबचा प्रवास करत असाल तर तुम्ही बहुधा हॉटेलमध्ये मुक्काम करतात. त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये नेहमी पांढऱ्या रंगाच्याच चादरी का वापरल्या जातात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? हा नियम जवळपास सर्वच ठिकाणी पाळला जातो. तरीही तुम्हाला तिथे कधीच रंगीत चादरी पाहायला मिळत नाहीत.

रुमचे सौंदर्य बिघडवतं

काळ्या रंगाची चादर टाळण्यामागे एकच कारण आहे: ते म्हणजे रुमचे सौंदर्य खराब करते. काळ्या रंगाची चादर खोलीतील रंगसंगती आणि इतर फर्निचरशी जुळत नाही, ज्यामुळे ती जागा निस्तेज दिसते.

डाग आणि मळ दिसत नाही

रंगीत किंवा काळ्या रंगाच्या बेडशीट्सवर डाग सहजासहजी दिसत नाहीत, ज्यामुळे त्या स्वच्छ आहेत की नाही हे कळत नाही. म्हणूनच बहुतेक हॉटेल्समध्ये पांढऱ्या बेडशीट्स वापरल्या जातात, जेणेकरून कोणतीही घाण किंवा डाग सहजपणे दिसून येतील.

रुम लहान वाटते

इंटिरिअर डिझाइनच्या तत्त्वांनुसार, काळ्या किंवा गडद रंगाच्या अंथरुणामुळे खोली लहान, निस्तेज आणि अनाकर्षक वाटते. ज्यामुळे तिचे सौंदर्य कमी होते. याउलट, पांढऱ्या रंगाचे अंथरुण खोलीला उजळ आणि स्वच्छ लूक देण्यास मदत करते.

पाहुण्यांना आरामदायी वाटत नाही

गडद काळ्या रंगाच्या आणि नीट अंथरलेल्या चादरींमुळे हॉटेलची खोली आकाराने लहान वाटते. काळ्या चादरींमुळे खोलीचा 'प्रीमियम' लूक कमी होतो आणि त्याचा मनावरही परिणाम होतो; त्यामुळे पाहुण्यांना आरामदायी वाटत नाही.

रंग फिका पडणे

काळ्या किंवा रंगीत बेडशीट्स धुणे बऱ्याचदा कठीण असते. यात रंग उतरण्याचा किंवा इतर कपड्यांवर डाग पडण्याचा धोका असतो. तसेच, केवळ एक-दोनदा वापरल्यानंतरच त्यांचा रंग फिका पडू लागतो.

हेही वाचा

येथे क्लिक करा

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?