Kalyan Police Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Police : हरवलेले ७२ मोबाईल नागरिकांना परत; कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी

Kalyan News : तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयातर्फे तांत्रिक पथकांची स्थापना करण्यात आली होती. पथकांनी CEIR पोर्टलचा वापर करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल ट्रॅकिंग मोहिम राबवली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत पोलिसांनी हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल फोन शोधून काढत नागरिकांना परत केले आहेत. यात साधारण ७२ मोबाईल ज्यांची एकूण १२ लाख रुपये किंमतीचे फोन आज तक्रारदारांच्या हाती देण्यात आले. नागरिकांनी या कामगिरीसाठी पोलीस दलाचे आभार मानले असून, डीसीपी अतुल झेंडे यांच्या हस्ते मोबाईलचे वाटप करण्यात आले.

बाजार, मार्केट परिसर तसेच गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईल लांबवत असतात. तर काही जणांचे मोबाईल हरविल्याची तक्रारी कल्याणच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दाखल होत्या. त्यानुसार २०२४ व २०२५ मध्ये कल्याण विभागातील खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यांत मोबाईल चोरी व गहाळ झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या. 

मोबाईल ट्रॅकिंगद्वारे ७२ मोबाईलचा शोध 

या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयातर्फे तांत्रिक पथकांची स्थापना करण्यात आली होती. पथकांनी CEIR पोर्टलचा वापर करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल ट्रॅकिंग मोहिम राबवली. या मोहिमेत कल्याण झोन तीन मधील खडकपाडा, महात्मा फुले, बाजारपेठ, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ११ लाख १८ हजार ७८० रुपयाच्या एकूण ७२ मोबाईलांचा शोध लावण्यात आला. हे सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. 

मूळ मालकांना मोबाईल परत 

दरम्यान ७२ मोबाईल हस्तगत केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल करणाऱ्यांशी संपर्क साधून शहानिशा करत आज कल्याण झोन तीनचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. दरम्यान हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी कल्याण पोलिसांचे आभार मानले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT