Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : मध्यरात्री बारवर पोलिसांची छापेमारी; महिला वेटरकडून अश्लील चाळ्यांचा पर्दाफाश

Kalyan News : पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अमर पॅलेस बारवर अचानक छापा मारला. पोलिसांच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे बारमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच पळापळ

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे

कल्याण : रात्रीच्या सुमारास सुरु असलेल्या बारमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कल्याण झोन ३ पोलिसांच्या पाघकाने ‘अमर पॅलेस’ बारवर मध्यरात्री छापेमारी करत कारवाई केली आहे. या छापेमारीत बारमधील महिला वेटरकडून ग्राहकांसोबत अश्लील चाळे सुरु असल्याचे निदर्शनास आले असून पोलिसांनी याचा पर्दाफाश केला आहे. 

कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी सुरू असलेला अवैध धंदा कल्याण झोन तीन पोलिसांच्या कारवाईमुळे चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अमर पॅलेस या बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून मध्यरात्री उशिरापर्यंत दारूची विक्री सुरू होती. इतकंच नाही तर येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी महिला वेटरकडून अश्लील चाळे करवून घेतले जात होते. याची गोपनीय माहिती कल्याण झोन तीनचे DCP आतूल झेंडे यांना मिळाली होती.

मध्यरात्री छापेमारी करत कारवाई 

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अमर पॅलेस बारवर अचानक छापा मारला. पोलिसांच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे बारमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली. याठिकाणी महिला वेटरकडून अश्लील चाळे सुरु असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर तात्काळ बारमधील कारभार थांबवत काही जणांना ताब्यात घेतले आहे.   

बार चालकासह बारबाला ताब्यात 

कल्याण पोलिसांच्या या धाडसी कारवाईमध्ये पोलिसांनी बारचा चालक, वेटर आणि एकूण दहा बारबालांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बार चालकासह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली असून बार चालकांमध्ये धडकी भरली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

UPI Rule: सरकारचा मोठा निर्णय! UPI च्या नियमांत मोठा बदल, उद्यापासून होणार लागू

India Tourism: गोव्याच्या किनारा खूप फिरलात, आता हे 7 Hidden स्पॉट नक्की करा एक्सप्लोर

Maharashtra Govermnet : ५ लाख रोजगार निर्माण होणार, महाराष्ट्र सराकारचे ९ धडाकेबाज निर्णय

Cobra Rescue : सरपटत गेला अन् बियरच्या कॅनमध्ये अडकला; विषारी सापाच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT