Jalgaon : ओल्या दुष्काळाची मागणी दुर्लक्षितच; जळगाव जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर कापसाचे नुकसान

Jalgaon News : शेतकरी शेतीकामे उरकू शकत नाहीत. फवारणीही करू शकत नाहीत. दरम्यान मागील चार- पाच दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतकरी शेतातील पिके काढण्याच्या तयारीला लागला आहे
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात जळगाव जिल्ह्यात पावसाने हानी अधिकची झाली असून मळणीवर आलेला सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान असताना देखील ओल्या दुष्काळाची मागणी दुर्लक्षितच आहे. 

मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे सर्वत्र नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मुख्य म्हणजे वेचणीवर आलेल्या कापूस पिकाचे देखील नुकसान झाले आहे. बोंडे ओली होऊन ती काळवंडू लागली आहेत. शेतकरी ओला झालेला कापूस वेचणी करून वाळवत आहे. असे सुमारे २५ हजार हेक्टरवरील वेचणीवर आलेला कापूसाचे नुकसान झाले आहे. 

Jalgaon News
Sangli Crime : घरच्यांचा विरोध झुगारून वर्षभरापूर्वी प्रेमविवाह; काही महिन्यातच सासरच्यांचा छळ अन् घडलं भयंकर

सोयाबीन, मक्याचेही नुकसान 

याशिवाय चार हजार हेक्टरवरील सोयाबीन, २५ हजार हेक्टरवरील मका आणि सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवरील मळणीवर आलेली ज्वारीची नासाडी पावसाने झाली आहे. जोरदार पावसामुळे पीक कापणी, मळणी, काढणीची कामे थांबलेली आहेत. शेतकरी शेतीकामे उरकू शकत नाहीत. फवारणीही करू शकत नाहीत. दरम्यान मागील चार- पाच दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतकरी शेतातील पिके काढण्याच्या तयारीला लागला आहे. 

Jalgaon News
Leopard Attack : नातवाला वाचविण्यासाठी आजोबाची बिबट्याशी झुंज; हल्ल्यात चार वर्षीय मुलगा जखमी

काही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर 

अतिपावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा बसल्याने पिकांचे नुकसान होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असून याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com