Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : कागदात तलवार लपवून फिरणारा पोलिसांच्या ताब्यात

कागदात लपवून तलवार घेऊन फिरणारा पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : गुन्हेगारी वाढत चालली असून खुलेआम शस्त्र घेऊन फिरत असतात. यात कल्याण पूर्वेत (Kalyan) कागदामध्ये तलवार घेऊन एक जण फिरत होता. गस्त घालत असलेल्या पोलिसांनी (Police) या तरुणाला ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

कल्याण पूर्वेतील वाढत्या गुन्हेगारीला अंकूश लावण्यासाठी कल्याण कोळशेवाडी पाेलिसांनी कल्याण पूर्वेत गस्ती वाढवल्या आहेत. या दरम्यान काल गस्ती दरम्यान कोळशेवाडी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. राज तिवारी नावाच्या एका गुन्हेगाराला तलवारीसह अटक करण्यात आली आहे. तर एका लूटीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या घनश्याम कनोजिया याला देखील अटक करण्यात आली.

कोळसेवाडी पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पेलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. गुरुवारी पोलिस अधिकारी रविराज मदने यांचे पथक गस्तीवर असताना एक सराईत गुन्हेगार महागड्यावर गाडीवर फिरत होता. त्याने कागदात लपेटून तलवार गाडीच्या टाकीवर ठेवली होती. पोलिसांनी राज तिवारी याला पकडले. त्याच्याकडून तलवार मिळून आली. त्याच प्रमाणे कोळसेवाडी पोलिसांनी एका लूटीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या घनश्याम कनोजिया याला देखील अटक केली आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Crime : बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून दरोडा; डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधींचे सोने व रोकड लांबविली

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

Bhandara Rain : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस |VIDEO

Pune News : एकीकडे धो धो पाऊस, दुसरीकडे तारामधून ठिणग्या अन् जाळ; मावळमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दोन दिवसात १० मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतातील कांदा गेला वाहून

SCROLL FOR NEXT