Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने चोरी; लोकलमधून मोबाईल व चैन लांबवताच सापडला पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : ठाणे येथे राहणारी तरुणी काम आटपून दादरहून ठाण्याला येण्यासाठी लोकलने निघाली होती. मात्र प्रवासात तिला झोप लागली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने काय करायचे या विचारातून चोरीचा मार्ग पत्करला. यात लोकलमधूल प्रवास करताना महिला प्रवासी झोपेत असल्याची संधी साधत तिच्या जवळील महागडा मोबाईल व गळ्यातील चैन चोरून पसार झाला होता. पहिल्यांदाच चोरी करणाऱ्या या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आशिष मकासुरे असे या चोरट्याचे नाव आहे. 

ठाणे येथे राहणारी तरुणी काम आटपून दादरहून ठाण्याला येण्यासाठी लोकलने निघाली होती. मात्र प्रवासात तिला झोप लागली. लोकल कसारा कार्डशेडला पोहोचल्यानंतर तिला जाग आली. त्यावेळेला तिला गळ्यातली चैन आणि स्वतः जवळील आयफोन गायब असल्याचे लक्षात आलं. तिने कसारा येथून लोकल पकडून थेट कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठले. या दरम्यान आरपीएफने एका तरुणाला महागडा मोबाईल व चैनसह ताब्यात घेतलं होतं. तरुणाकडे मोबाईल विषयी चौकशी केली असता त्याने काहीच उत्तर न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्याला (Kayan) कल्याण पोलीस ठाण्यात आणले. याच वेळी तरुणी देखील तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर होती. 

आशिष मकासुरे याला पोलिसांनी अटक केली. आशिष हा भांडूपचा राहणारा आहे. त्याची आई आजारी असल्याने मिळेल ते काम करून तो आईचा व स्वतःचा उदरनिर्वाह करतो. आईच्या उपचारासाठी पैशाची गरज होती. पैशासाठी त्याने मोबाईल व चैन चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण (Railway Police) जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कल्याण जीआरपी पोलिसांनी आणखीन एक आरोपीला अटक केली आहे. ज्याचे नाव विशाल प्रसावधान असे आहे. या आरोपीने देखील कल्याण रेल्वे स्थानकातून एका प्रवाशाचा मोबाईल चोरी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT