Akola Accident : ट्रक- दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू; ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली

Akola News : अकोला- खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचे चाक या भेगांमधून गेले
Akola Accident
Akola AccidentSaam tv

अक्षय गवळी 
अकोला
: अकोला- खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला आहे. 

Akola Accident
Sambhajinagar Corporation : धोकादायक इमारती मनपा करणार सील; पावसाळ्याच्या अनुषंगाने पाऊल

अकोला (Akola)- खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचे चाक या भेगांमधून गेले आणि त्यात अडकले. त्यानंतर मोटरसायकल स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या (Accident) अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झाला. तर दुसरा देखील महामार्गावर फेकला गेल्याने त्याचाही मृत्यू झाला. सचिन जुनारे आणि शाम महल्ले असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

Akola Accident
sangli Crime : सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी; तीन महिला अटकेत

ट्रक चालक ताब्यात 

सदर अपघात झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक आणि स्थानिक (Police) पोलिसांनी येत  महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघाताप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com