महाराष्ट्र

Raju Patil : तुम्ही राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट नका करू; राजू पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा

Raju Patil : मनसे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक करतील मोठ्या बहुमताने निवडून येतील असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजीत देशमुख)

कल्याण: एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही, असा नरेटिव्ह सेट केला जातोय. नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलाय.

आजतागायत इतक्या राजकीय घटना घडल्या उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केलाय का? घराच्या शेजारी शपथविधी होता त्यावेळेला सांगितलं नाही. तुम्ही तुमचं राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या अनेक निर्णयापैकी हा एक निर्णय आहे. जेव्हा-जेव्हा फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंनी विचारलं. तेव्हा राज्यसभा असेल विधानसभा असेल अशा वेळेस आम्ही पाठिंबा दिलाय, त्यामुळे असं नाही की आत्ता बिनशर्त पाठिंबा दिलाय.

ही लोकसभा निवडणूक वाघाचे डीएनए टेस्ट आहे आता लवकरच कळेल. कोण नकली कोण असली त्यामुळे मी काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहेत तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

मनसे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक करतील मोठ्या बहुमताने निवडून येतील असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केलाय. २६ तारखेनंतर प्रचाराला वेग येणार असून त्या अनुषंगाने येत्या २६ तारखेच्या आधी अविनाश जाधव आणि मी मेळावे घेणार आहोत. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारांनाही तिकडे आमंत्रित करणार आहोत, अशी माहिती राजू पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mine Collapse : पूल तुटला, आरडा-ओरड अन् किंकळ्या, ४० जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKYC साठी २ महिन्यांची मुदतवाढ मिळणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Four Rajyog On 2026: पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच बनणार 4 राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब रातोरात चमकणार

Maharashtra Live News Update: नामांकनासाठी आज शेवटचा दिवस, रॅलीसह शक्ती प्रदर्शनाची तयारी

Local Body Election : अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का, गोगावलेंनी रायगडचे राजकारण फिरवले

SCROLL FOR NEXT