VIshwanath Bhoir Raju Patil Saam tv
महाराष्ट्र

Political News : स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीतरी बोलतात व प्रसिद्धी मिळवतात; आमदार विश्वनाथ भोईर यांचा आमदार राजू पाटलांना प्रत्युत्तर

Kalyan News : खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: निधी शासनाचा असला तरी काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. परंतु स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीतरी (Kalyan) बोलतात म्हणजे प्रसिद्धी मिळेल. प्रसिद्धी मिळवणाऱ्यांचे आमच्या पुढे काही चालत नाही, आम्ही कामाने उत्तर देतो; असे प्रतिउत्तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) याना दिले. (Tajya Batmya)

खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत (MNS) मनसे राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल सर्वसामान्यांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये रोष, त्यांना बदल हवा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज मनसे आमदार राजू पाटील यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार भोईर म्हणाले की ,राजकीय (Shiv Sena) लोकांमध्ये नाराजी असणे ठीक आहे. त्या- त्या पक्षाला मदत नाही केली किंवा डावलले तर विरोध करतो तो भाग वेगळा आहे. मात्र कल्याण लोकसभा क्षेत्रातील नागरिक असे बोलत असतील हे चुकीचं वाटतं. कल्याण लोकसभा मतदार संघातील श्रीकांत शिंदे किती काम करतात हे सगळ्यांनी बघितलंय. कल्याण लोकसभा क्षेत्रात खूप विकासकामे होत आहेत. मग ही काम कोण करतय. निधी शासनाचा असला तरी ते करण्याची इच्छाशक्ती पाहिजे, नागरिकांसाठी विकासकामे करत असताना कार्यसम्राट खासदार म्हणून त्याची प्रतिमा तयार होतेय. सामान्य लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT