Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कल्याणमध्ये आठवड्याभरात सुरु होणार मीटर रिक्षा; आरटीओ अधिकाऱ्यांकडून पाहणी

Kalyan News : अनेक वर्षांपासून कल्याण शहरातील रिक्षा मीटरप्रमाणे चालवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. याला अखेर मुहूर्त मिळाला असून पुढील आठवड्यात कल्याण वासियांची प्रतीक्षा संपणार आहे

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे 
कल्याण
: मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये मीटरनुसार रिक्षा सेवा उपलब्ध असताना कल्याणात या विषयाला मुहूर्त सापडत नव्हता. मात्र आता प्रवाशांच्या या दीर्घ काळाची मागणी प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात कल्याण स्टेशनवरील एक मार्गिका ही मीटर रिक्षांसाठी आरक्षित केली जाणार असून या पार्श्वभूमीवर रिक्षा युनियन, रेल्वे व्यवस्थापक, आरटीओ अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली.

गेल्या दशकापासून कल्याणात मीटरप्रमाणे रिक्षा सेवा चालवण्याची मागणी केली जात होती. मात्र कधी प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे सांगत तर कधी रिक्षा चालकांचा विरोध असल्याने हा प्रश्न इतक्या वर्षानंतरही प्रलंबित राहिला. मात्र हा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रणव पेणकर, रेल्वे स्टेशन मास्तर आर. मीना, आरटीओ अधिकारी प्रशांत देवरे यांच्यासह जीआरपी आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी आज स्टेशन परिसरात पाहणी केली. 

आठवडाभरात सेवा 

स्टेशन परिसरात पुढील आठवड्याभरात मीटर रिक्षांसाठी स्टेशन परिसरातील एक मार्गिका आरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती रिक्षा युनियनचे नेते प्रणव पेणकर यांनी यावेळी दिली. अर्थात गणेशोत्सवाच्या काळात कल्याणकरांना हि सुविधा मिळत आहे. उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा रांगेच्या मागील बाजूस असलेल्या मार्गिकेतून या मीटरद्वारे रिक्षा उपलब्ध होणार आहेत.

प्रवाशांकडून निर्णयाचे स्वागत 

रिक्षा चालकांनी या नियमाचे पालन करण्यासाठी रेल्वे अधिकारी, आरटीओ, जीआरपी, आरपीएफ हे पुढील महिनाभर याठिकाणी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर स्थानिक प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, कल्याणमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरू झाल्यास प्रवाशांची दीर्घकाळची गैरसोय दूर होईल आणि रिक्षा प्रवास अधिक पारदर्शक तसेच सोयीस्कर बनेल," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात पोळा सण उत्साहात साजरा.

PMC Election: मोठी बतमी! पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

राजकारणाला हादरा देणारी घटना, एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय कक्ष प्रमुखावर रक्तरंजित हल्ला, घटनेनं खळबळ|VIDEO

Success Story : शिलाई मशीन आणि पंखे विकणाऱ्या सामान्य मुलाने उभी केली ₹७,००० कोटींची कंपनी, जाणून घ्या नानू गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास...

Dream 11 : २८ कोटी यूजर, ९६०० कोटींचा महसूल, ड्रीम ११ चा गेम संपणार? पण पैसे परत कसे मिळवायचे?

SCROLL FOR NEXT