पुणे : पुण्यातील गणेशोत्सवा बाबत विविध चर्चा शहरात सगळीकडे रंगल्या होत्या. तसेच उत्सवाबाबत तसेच विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात गणेश मंडळातील वाद देखील समोर आले. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार यांच्या पुढे गणेश मंडळांनी त्यांचे प्रश्न मांडले. अखेर आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे झालेल्या सर्व गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला असून मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता सहभागी होतील; असा निर्णय झाल्यानंतर सगळ्याच गणेश मंडळांनी आनंद व्यक्त केला आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे. यासाठी गणेश मंडळांची देखील तयारी सुरु आहे. मात्र पुण्यातील गणेशोत्सवाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र गणेशोत्सवाच्या वादाची ठिणगी अखेर आजच्या बैठकीनंतर शमली आहे. बैठकीला शहरातील मानाच्या पाचही गणपती मंडळांचे प्रमुख उपस्थित असताना त्यांनी सुद्धा विसर्जन मिरवणुकीत १ तास आधी सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
सकाळी साडेनऊला विसर्जन मिरवणूक
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेच्या बाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत मोहोळ म्हणाले, मानाचे गणपती सकाळी ९.३० वाजता मिरवणूक सुरू करतील. विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची संख्या कमी केली जाईल. तसेच सगळ्या मिरवणुकीत स्थिर वादन कोणी करणार नाही. पुण्यातील मिरवणूक वेळेत संपवायला हवी ही सगळ्या गणेश मंडळांची भूमिका होती. त्यानुसार मिरवणूक कमी वेळेत संपन्न होईल.
विद्युत रोषणाईचे मंडळ सायंकाळी सातनंतर मिरवणुकीत
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, कि कुठलेही मनभेद नव्हते. संवाद होणे अपेक्षित होतं आणि आज तो झाला. आमच्यामध्ये मिरवणुकीच्या निमित्ताने दोन मतं नाही सर्वांचे एकच मत आहे. वाद नव्हतेच, दोन विचार वेगळे होते. भाजपचे आमदार आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे मुख्य पदाधिकारी हेमंत रासने म्हणाले, मानाचे गणपती व्यवस्थेचा भाग आहेत, सगळेच मानाचे गणपती आहेत. विसर्जन मिरवणूक सकाळी ९.३० वाजता सुरू करण्याच्या मागणीला सगळ्यांचा सकारात्मक प्रतिसाद. बिगर विद्युतरोष्णाई सकाळी १२ ते ७ यांना मार्ग मिळेल आणि विद्युत रोषणाई यांना ७ नंतर मिरवणुकीत सहभाग होईल. दगडूशेठ गणपती ४ वाजता मार्गस्थ होईल आणि एक ढोल ताशा पथक असेल.
कसबा गणपती एकतास आधी मिरवणुकीत
मानाचा पहिला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले, आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने यांच्यासोबत बैठक झाली. कसबा गणपती म्हणजेच मानाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात एक तास पूर्वी करत आहोत. प्रशासनाकडून सगळ्या मंडळांना समान वागणूक मिळावी. येत्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवावर लक्ष केंद्रित करायला हवं. गणेशोत्सवाचा मूळ गाभा धार्मिकता आणि प्रबोधन आहे त्यावर लक्ष देऊया. सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करू. ढोल ताशांच्या पथकांची संख्या, पथकातील वादकांची संख्या यावर आणखी बैठक घेऊन चर्चा करू," असं ही शेटे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.