World Mental Health Day Saam tv
महाराष्ट्र

World Mental Health Day : झोपेचा अभाव व मोबाईलमुळे वाढला मानसिक आजाराचा धोका; कल्याण- डोंबिवलीत ७७ रुग्णांवर उपचार सुरु

Kalyan Dombivali News : मानसिक आरोग्यासाठी ‘आहार, विहार, निद्रा आणि विवेकी विचार’ यावर लक्ष देणं गरजेचं आहे. झोपेची योग्य सवय, मोबाईल स्क्रिन टाईम कमी करणं, योगा-व्यायाम करणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं हीच खरी औषधं

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे 

कल्याण : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण व्याधींनी त्रस्त आहेत. यामुळे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोळ्या घेऊन आयुष्य जगत आहेत. मात्र यात धक्कादायक म्हणजे मानसिक आजार देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्रामुख्याने अपूर्ण झोप आणि मोबाईलचा वाढता वापर याला अधिक कारणीभूत ठरत आहे. यामुळे तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक म्हणेज ७० ते ८० टक्के वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन (१० ऑक्टोबर) साजरा केला जात असताना कल्याण- डोंबिवली शहरातून एक गंभीर आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. मनोविकारतज्ज्ञ डॉ. विवेक चिंचोले यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना महामारीच्या संकटानंतर डोंबिवली शहरात १० ते २० टक्क्यांनी मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांत एकट्या डोंबिवलीत सुमारे ६५ हजार तर कल्याणमध्ये १० ते १२ हजार रुग्णांनी मानसिक आजारांसाठी उपचार घेत आहेत. या आजारांमध्ये २० ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण ७० ते ८० टक्के इतके मोठे असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनानंतर वाढले मानसिक आजाराचे प्रमाण 

कोरोना महामारीचे संकट गेल्यानंतर मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. डोंबिवली शहरात १० ते २० टक्के मानसिक आजराचे प्रमाण असून कल्याण डोंबिवलीकरांनी मानसिक स्वास्थ्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. गेल्या दहा वर्षात डोंबिवलीत सुमारे ६५ हजार तर कल्याण मध्ये दहा ते १२ हजार म्हणजे असे मनोविकाराशी सलग्न असे रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे मनोविकार तज्ञ डॉ. विवेक चिंचोले यांनी सांगितले. 

१०० नागरिकांमागे १४ जणांना आजार 

जो सर्वे झाला हे तो असा की १०० पैकी १४ जणांना हा आजार आहे. मानसिक आजारात तरुणांचे प्रमाण जास्त असून २० ते ३५ वयोगटातील ७० ते ८० टक्के तरुण आहेत अशी माहिती मनोसपचारतज्ञ डॉ. विवेक चिंचोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. डोंबिवलीत दहा ते बारा मानसोपचारतज्ञ आहेत. ही संख्या उपचाराकरता आलेल्या रुग्णांची असून अनेक मनोरुग्ण आहेत जे उपचाराकरता येतच नाहीत, ते सहन करता राहतात. कारण यातील गैरसमज आहे की मानोसपचारतज्ञाकडे उपचाराकरता गेले म्हणजे वेडसरपणा. तर या आजारावर उपचार आहेत का? त्यांना डॉक्टर्स आहेत का? हेच मुळात काहीना माहित नसते. अशी बरेच लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात.

कल्याण डोंबिवलीत नशेखोरांचा प्रमाण वाढत आहे. मनोविकार पेक्षा मनोविकास हे जास्त महत्वाचे आहे. त्याकरता तणाव नियोजन हे अगदी सुरुवातीपासून म्हणजे लहान मुलांना शिकविले पाहिजे आणि आपण स्वतः हे आत्मसात केले पाहिजे. आहार, विहार, निद्रा आणि विवेकी विचार याकडे लक्ष दिले पाहिजे. झोप व्यवस्थित झाली पाहिजे, कारण झोपेचा सवयी चुकल्यानेही मानसिक आजार होतात. मोबाईल स्किन टाईम कमी करावा. झोपण्याआधी मोबाईल नको, जेवणाच्या टेबलावर मोबाईल नको, एकमेकांशी बोला, व्यायाम आणि योगा केला पाहिजे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Trick: चुकून मेसेज-फोटो डिलीट झालेत? फक्त एका क्लिकमध्ये करा रिकव्हर; जाणून घ्या सोपी पद्धत

सत्संगवरून येताना भयंकर घडलं, चारचाकी अन् ट्रॅक्टरचा अपघात, पती- पत्नी अन् चिमुकलीचा मृत्यू

Cancer Prevention: कॅन्सरचा धोका होईल कमी, फक्त ‘ही’ ४ फळ खा; तज्ज्ञांनी सांगितलं मोठं रहस्य

World Cup: हिंदुस्तान जिंदाबाद...; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून भारतीय महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव

Famous Singer Concert: मुंबईत प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा डल्ला, २३ लाखांचे मोबाईल लंपास

SCROLL FOR NEXT