Bhiwandi : फी न भरल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्याला बसविले जमिनीवर; मुख्याध्यापकासह शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhiwandi News : शुल्क न भरल्यामुळे दहावीच्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे जमिनीवर बसवण्यात आले असे आरोप आहे, तर त्याला परीक्षेसाठी जमिनीवर बसण्यास भाग पाडण्यात आले.
Bhiwandi News
Bhiwandi NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
भिवंडी
: भिवंडीमध्ये मानवतेला आणि शिक्षणाच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. शाळेची फी न भरल्यावरून विद्यार्थ्याला पेपर देण्यासाठी जमिनीवर बसविण्याचा प्रकार शहरातील सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये घडला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरातील सलाउद्दीन अय्युबी मेमोरियल हायस्कूल अँड कॉलेज मध्ये दहावीत शिकणाऱ्या फहाद फैज खान या विद्यार्थ्यांची चालू वर्षाची तेराशे रुपये फी भरण्याचे बाकी राहिली आहे. सदरची फी न भरल्याच्या कारणास्तव त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी वागणूक देत खाली चटईवर बसून परीक्षा देण्याची शिक्षा देण्यात आली. अर्थात शाळेतील अन्य विद्यार्थ्यांपेक्षा या विद्यार्थ्याला वेगळे बसविण्यात आले होते. 

Bhiwandi News
Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

दरम्यान फी न भरल्याच्या कारणावरून जमिनीवर बसवून पेपर देण्यास भाग पडल्याने विद्यार्थ्याला देखील अपमानास्पद वाटले होते. दरम्यान शाळेत घडलेल्या सदर प्रकाराबाबत विद्यार्थ्यांने ही संपूर्ण घटना वडिलांना सांगितली. या नंतर फहाद खान याच्या वडिलांनी शाळेत जात शाळा प्रशासनाला या प्रकरणी जाब विचारला. यावर शाळेकडून मुलाची फी न भरल्याने ही शिक्षा दिल्याचे सांगितले. तर विद्यार्थ्याच्या स्वाभिमानाचे आणि अधिकारांचे उघडपणे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलाला नैराश्याचा सामना करावा लागला आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Bhiwandi News
कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

मुख्याध्यापकासह शिक्षकावर गुन्हा दाखल 

सदरच्या शाळा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या प्रकाराबाबत फैज खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिकासह शिक्षकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधात अल्पवयीन बालकांची काळजी व संरक्षण कायद्याच्या 75 आणि 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शाळा व्यवस्थापनाच्या या अमानुष वृत्तीचा तीव्र निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com