KDMC
KDMC  Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : कल्याण डोंबिवलीतील १२ बिल्डरांना केडीएमसीची नोटिस; इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांच्या आळ्या

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: पावसाळा सुरु झाल्याने पावसाचे पाणी साचून राहते. यात डासांची उत्पत्ती होऊन साथरोग पसरण्याची शक्यता असते. यामुळे प्रशासनाकडून सर्व्हे करत डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी सफाई करून संबंधिताला नोटीस दिली जात आहे. अशाच प्रकारे नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्याने कल्याण- डोंबिवलीतील १२ बिल्डरांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतिच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठून त्यात डास आळ्या तयार होतात. त्यातून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होतो. तो रोखण्याकरीता कल्याण (Dombivali) डोंबिवली महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या पथकाने नव्याने बांधकाम केले जात असलेल्या गृह निर्माण प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीत बांधकामाच्या काही ठिकाणी साचलेल्या पावसाच्या (Kalyan) पाण्यात डास आळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे आरोग्य विभागाकडून येथे तात्काळ कार्यवाही करण्यात आली. 

दरम्यान बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात ज्या ठिकाणी आल्या आढळून आल्या आहेत; त्या १२ बिल्डरांना (KDMC) केडीएमसी प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच  यासह महापालिका हद्दीतील नव्याने बांधकाम केले जात असलेल्या सर्व बिल्डराना पावसाचे पाणी साठणार नाही. तसेच दूषित पाणी साचणार नाही. त्यात डास आळ्या तयार होणार नाही; याची काळजी घ्यावी असे आवाहन करन्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आमचं प्रेम वेगळं, शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं; अजितदादांच्या आमदारांची कबुली

Surat Building Collapse Video : मोठी बातमी! सूरतमध्ये ६ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून ७ जण ठार, अनेक जखमी

Akola News : अकोल्यातील जवान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न

Weather Alert : विदर्भ-मराठवाड्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; मुंबईतही तुफान पाऊस कोसळणार, IMD कडून अलर्ट

Rashi Bhavishya : 'या' राशींसाठी रविवार ठरणार लकी, जे हवं ते मिळेल

SCROLL FOR NEXT