Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Kalyan Dombivali News : कल्याण- डोंबिवली परिसरात मागील तीन- चार दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे
कल्याण
: हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार ठाणे जिल्ह्याला कालपासून पावसाने झोडपून काढले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे बारवी धरणातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कल्याण- डोंबिवलीत ठिकठिकाणी खाडी आणि नदी किनारच्या भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. 

कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला कालपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पावसाच्या आकडेवारीचा विचार करता गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीत १७२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

Kalyan Heavy rain

अनेक भागात पाणी साचल्याने घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. तर रायते पुलावरून पाणी वाहू लागल्याने काल रात्रीपासून बंद असणारा कल्याण - मुरबाड मार्ग आजही बंद आहे. पर्यायी असणारा टिटवाळा - रायते मार्गही पाण्याखाली गेल्याने हा मार्गही बंद झाल्याने अनेकांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

Kalyan Heavy rain

या भागात शिरले पाणी 

मुसळधार पावसामुळे बारवी धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून अकरा दरवाजांमधून तब्बल २३६ क्युसेक इतका प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे. एकीकडे मुसळधार आणि दुसरीकडे बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीद्वारे कल्याणच्या नदीकिनारी असलेल्या वालधुनी, योगीधाम, रिंगरोड अशा अनेक सखल भागात शिरले आहे. तर पुढे हेच पाणी कल्याण खाडीलाही जाऊन मिळत असल्याने दुर्गाडी गणेश घाट, रेतीबंदर परिसर जलमय झाला. त्यासोबतच शहाड मोहने, योगीधाम, गौरीपाडा सिटी पार्क, भवानी नगर, कल्याण पूर्वेतील अशोक नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, वालधुनी परिसरातील अनेक चाळी आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

Kalyan Heavy rain

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी 
उल्हास नदी पात्रातील पाणी केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. यामुळे खबरदारीची उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी ओसरल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. परिणामी संपूर्ण अ प्रभाग क्षेत्र, ब प्रभाग क्षेत्राचा काही भाग आणि जे प्रभाग क्षेत्रातील अशोक नगर, शिवाजीनगर वालधुनी या परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच काळू नदीवरील टिटवाळा जॅकवेलमध्येही पाणी आल्याने टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र सकाळी ८.३० वाजेपासून बंद करण्यात आले आहे. 

Kalyan Heavy rain

२४ तासांतील पावसाची आकडेवारी
कल्याण डोंबिवली - १७२.६ मिलिमीटर
ठाणे - १९६.९
मुरबाड - १२२
भिवंडी - १७९
शहापूर- १२६
उल्हासनगर - २२२
अंबरनाथ - १४१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT