Kalyan Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival : गणेश विसर्जनानिमित्त वाहतुकीत बदल; माणकोली पुलावर वाहतुकीला बंदी; विसर्जनाचे चार दिवस असणार पर्यायी मार्ग

Kalyan Dombivali News : विसर्जनाच्या काळामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी डोंबिवलीहून भिंवडीकडे जाण्यासाठी आणि भिवंडीहून डोंबिवलीत येण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे 
डोंबिवली
: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वाना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले असून त्याची तयारी सुरु आहे. दरम्यान कल्याण डोबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत रेतीबंदर मोठागाव माणकोली ब्रिजखालील रेतीबंदर खाडी येथे गणपती विसर्जन होत असते. त्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या प्रमुख चार दिवस माणकोली पुलावरील वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 

गणेशोत्सव काही दिवसांवर आहे. मंडळांची तयारी सुरु असून २७ ऑगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करणारे अनेक भाविक दीड दिवस, पाच दिवस, सातव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करत असतात. तर अकराव्या दिवशी मोठ्या मंडळांसह सर्वच गणपतींचे विसर्जन केले जाते. दरम्यान विसर्जनाच्या काळामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी डोंबिवलीहून भिंवडीकडे जाण्यासाठी आणि भिवंडीहून डोंबिवलीत येण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

या दिवशी राहणार पुलावर बंदी 
याठिकाणी २८ ऑगस्टला दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, ३१ ऑगस्टला पाच दिवस, २ सप्टेंबरला गणपती - गौरी विसर्जन आणि ६ सप्टेंबरला अनंत चर्तुदशीचे गणपती विसर्जन होणार आहेत. या चारही दिवशी माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ट्रॅफिक डीसीपी पंकज शिरसाट यांनी दिली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून गणेश विसर्जन होईपर्यंत ही अधिसूचना लागू राहणार आहे. तर ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

असे असतील पर्यायी मार्ग
- प्रवेश बंद  १) : ठाणे, मुंबई येथुन माणकोली मोठागाव ब्रिजवरून मोठागाव डोबिवली पश्चिम येथे येणारी वाहतुक नारपोली वाहतूक उपविभाग हद्दीत १) मानकोली भिंवडी हायवे, २) अंजुर दिवेगाव, ३) लोढा धाम येथे प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग : सर्व वाहने नारपोली वाहतूक उप विभाग यांचे हद्दीत अंजुर फाटा, राजनोली भिवडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

- प्रवेश बंद २) : कल्याण, अंबरनाथ, बदलापुर, नवीमुंबई येथुन मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना कोळसेवाडी वाहतूक उप विभाग हद्दीत १) पत्रीपुल, २) टाटा नाका, ३) सुयोग हॉटेल, ४) डी एन एस बँकेजवळ, सोनारपाडा ५) मानपाडा पेट्रोलपंपाजवळ, मानपाडा चौक, ६) घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग : ही वाहने कल्याण वाहतूक उप विभागाचे ह‌द्दीतुन दुर्गाडी चौक कल्याण मार्गे इच्छितस्थळी जातील.

- प्रवेश बंद ३) : ठाकुर्ली पुर्व - डोंबिवली पुर्वकडुन मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिंवडीकडे जाणाऱ्या वाहनांना कोपर ब्रिज आणि ठाकुर्ली ब्रिज येथे प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग : ही वाहने कल्याण वाहतूक उप विभागाचे हद्दीतुन दुर्गाडी चौक कल्याणमार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद ४) : डोंबिवली पश्चिमेकडुन मोठागाव ब्रिजमार्गे माणकोली भिंवडीकडे जाणाऱ्या वाहनांना मोठागाव ब्रिज येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग : ही वाहने कल्याण वाहतूक उपविभागाचे हद्दीतुन दुर्गाडी चौक कल्याणमार्गे इच्छित स्थळी जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT