Kalyan Crime saam tv
महाराष्ट्र

Kalyan: वाईट नजर अन् मानसिक छळ, शिंदे गटाच्या नेत्याविरूद्ध दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा; नेमकं घडलं काय?

Kalyan Crime News: शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर पुन्हा एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल. मानसिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. कल्याणमध्ये राजकीय खळबळ उडाली.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर पुन्हा एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने त्यांच्या विरोधात वाईट नजर, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे कल्याणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची अडचण वाढली आहे.

मोहन उगले असे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवकाचे नाव आहे. मोहन उगलेंकडून पीडित महिलेला त्रास सहन करावा लागत होता. मोहन उगले वारंवार पीडित महिलेकडे वाईट नजरेने पाहून मानसिक छळ करत होते, असा आरोप महिलेनं केला आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचंही पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. याच छळाला कंटाळून पीडितेनं कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले. तसेच मोहन उगले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. याआधीही दोन महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या राणी कपोते यांनी मोहन उगले यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यांनी भररस्त्यात उगले यांना चापट मारल्याचा व्हिडीओही त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ही घटना ताजी असतानाच मोहन उगले यांच्यावर पुन्हा एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणामुळे शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती सर्व गमवाली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

मराठी हिंदी वादात राज्यपालांची उडी,भाषिक वाद राज्यासाठी अहितकारी

Ganesh Chaturthi: कोकणातील चाकरमान्यांसाठी खूशखबर, गणेशोत्सवाला ट्रेनमधून कार नेता येणार

SCROLL FOR NEXT