Kalyan Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Bribe Case : परवाना मंजूरीसाठी मेडिकल दुकानदाराकडे मागितले एक लाख; औषध निरीक्षकासह साथीदार ताब्यात

Kalyan News : तक्रारदाराला नवीन मेडिकल सुरू करायचे होते. या मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी त्यांनी ठाणे अन्न औषध प्रशासन विभागाकडे परवानगी मागितली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी तब्बल एक लाखाची लाच मागणी केली. या लाच मागणाऱ्या अन्न व औषध प्रशासन ठाणे विभागाच्या औषध निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला नवी मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत बेड्या ठोकल्या. संदीप नरवणे असे या ठाणे एफडीएच्या औषध निरीक्षकाचे नाव आहे. तर सुनील चौधरी असे या खाजगी व्यक्तीचे नाव आहे.  

तक्रारदाराला नवीन मेडिकल सुरू करायचे होते. या मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी त्यांनी ठाणे अन्न औषध प्रशासन विभागाकडे परवानगी मागितली. या विभागात काम करणारे औषध निरीक्षक संदीप नरवणे यांनी तक्रारदाराकडे परवाना मंजूर करण्याकरता शासकीय फी व्यतिरिक्त एक लाख रुपये लाचेची (Bribe) मागणी केली. त्यानुसार नरवणे याचा साथीदार सुनील चौधरी याच्यामार्फत झालेल्या तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. दरम्यान तक्रारदाराने याबाबत नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) तक्रार केली.

तक्रारीनुसार अँटी करप्शनच्या पथकाने (Kalyan) कल्याणमधील डी मार्ट समोर सापळा रचला. याच दरम्यान ८ जुलैला संदीप नरवणे व त्याचा साथीदार सुनील चौधरी हे दोघे पैसे स्वीकारण्यासाठी आले. तक्रारदार यांच्याकडून संदीप नरवणे याने ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपस सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT