KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : पाच वर्षांपासून अधिकाऱ्यांकडून मोठा भ्रष्टाचार; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

Kalyan News : कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरिक समस्या, ६५ बेकायदा इमारत प्रकरणात नागरिकांची फसवणूक आदी समस्यांबाबत काँग्रेसने केडीएमसी बाहेर धरणे आंदोलन केले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कोरोना महामारीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. तर २०१५ नंतर केडीएमसीची निवडणूक झाल्या असून २०१९ पासुन प्रशासकीय राजवट सुरू आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर कुणाचा अंकुश नाही. यामुळे गेल्या पाच वर्षात केडीएमसी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढा. भ्रष्ट व माजोरड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी आज काँग्रेसने केडीएमसीच मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. 

कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरिक समस्या, ६५ बेकायदा इमारत प्रकरणात नागरिकांची फसवणूक आदी समस्यांबाबत काँग्रेसने केडीएमसी मुख्यालया बाहेर धरणे आंदोलन केले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यानी सहभाग घेतला होता. 

नागरिकांच्या समस्या प्रशासन ऐकेना 

२०१९ नंतर कल्याण- डोंबिवली महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. सरकारकडून जाणूनबुजून कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुका घेतल्या जात नाहीत. यामुळे नागरिकांना समस्या भेडसावत आहेत. हाताच्या बोटावर मोजणारे माजी नगरसेवक कार्यरत आहेत. नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. मात्र महापालिका प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नाहीत; असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला. 

भ्रष्ट्राचाराची श्वेतपत्रिका काढा 

याशिवाय ६५ बेकायदा इमारत प्रकरणात महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी देखील सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनावर कोणाचा अंकुश नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. गेल्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. या पाच वर्षाच्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका सरकारने काढावी. तसेच भ्रष्ट व मुजोर अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी. त्यांना पाठीशी घालू नये अशी मागणी या धरणे आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पोटे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT