Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: सराईत इराणी चोरटा गजाआड; विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल, मानपाडा पोलिसांची कारवाई

सराईत इराणी चोरटा गजाआड; विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल, मानपाडा पोलिसांची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : मानपाडा पोलिसांनी एका इराणी चोरट्याला अटक केली आहे. मुस्तफा उर्फ मुस्सू जाफर सय्यद ईराणी असे नाव आहे. धक्कादायक (Dombivali) म्हणजे २४ वर्ष वय असलेल्या चोरट्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चैन स्नेचींग, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी प्रकरणी तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत. या चोरट्याकडून (Police) पोलिसांनी ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आठ मोटरसायकल, पाच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. (Live Marathi News)

डोंबिवली परिसरात चैन स्नेचींग, मोबाईल चोरी दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी डोंबिवली एसीपी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, अविनाश वनवे यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. याच दरम्यान पोलिसांना सराईत चोरटा मुस्तफा उर्फ मुस्सू जाफर सय्यद ईराणी हा शहाड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे (Manpada Police) पोलिसांनी शहाड परिसरात सापळा रचत मुस्तफा उर्फ मुस्सू जाफर सय्यद ईराणी याला अटक केली.

१३ गुन्‍ह्यांची उकल

पोलीस तपासात त्याने मानपाडा, कळवा, शिवाजीनगर मध्यवर्ती, नारपोली, कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या साथीदाराच्या मदतीने केलेल्या चैन, मोबाईल स्नेचींग, दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. मुस्तफा याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत. यामधील १३ गुन्ह्यांची उकल करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोटरसायकल, मोबाईल असा ऐकून सव्वा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. मुस्तफा याचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

SCROLL FOR NEXT