Eknath Shinde  Saam TV
महाराष्ट्र

तृतीयपंथींसाठी कल्याण महामंडळ; शिंदे गटातील आमदाराच्या पत्राची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता, कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : आपण सरकार म्हणून ’कल्याणकारी राज्य“ ही संकल्पना ध्यानात ठेऊन सर्व समाज घटकांसाठी काम करीत आहोत. वंचित, दुर्लक्षित व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वर्गाच्या कल्याणासाठी हे सरकार संवेदनशील आहे आणि अधिक गांभीर्याने लक्ष देत आहे. समाजात असलेले तृतीयपंथीयांच्या विविध मागण्या (Transgender demand) प्रलंबित आहेत. तृतीयपंथीय समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी गेल्या अधिवेशनात त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या. त्यांच्या या गंभीर समस्येबाबत शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राची शिंदे यांनी दखल घेतली असून तृतीयपंथींसाठी कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. (Transgender Latest News update)

तृतीयपंथीयांना समाजात बहिष्कृत केले जाते किंवा वाईट वागणूक मिळते. तृतीयपंथीयांना रोजगार नसल्याने ते भीक मागताना, ट्रॅफिक सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी दिसतात. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबणा होते. त्यामुळे अशी शौचालये तातडीने बांधणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र सेल, रेल्वेगाडीत महिलांसाठी असते तशी तृतीयपंथीयांसाठीच स्वतंत्र बोगी,सरकारी अर्जामध्ये स्त्री,पुरूष याप्रमाणेच तृतीयपंथी असा तिसरा कॉलम असावा,यासह त्यांच्या रोजगार,घर,शिक्षण याबाबत अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत.

तृतीयपंथीयांच्या हितासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने ’उत्तर प्रदेश किन्नर कल्याण मंडळाची“ स्थापना केल्याचे मला समजले. महाराष्ट्र हा प्रगत तर आहेच पण देशाला दिशा दाखविणारे राज्य आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या हितासाठी ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामध्ये तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे शिक्षण,रोजगार,घर आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी काम करण्यासाठी हे महामंडळ आवश्यक आहे. तृतीयपंथीयांच्या सर्व मागण्या,त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी काम होणे आवश्यक आहे.

हे काम समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत होणे आवश्यक असल्याचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राची दखल घेऊन किन्नरासाठी ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT