त्याच बुडबुड्याने तुमची धुलाई..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळणे - शिंदे
Eknath shinde and uddhav thackeray
Eknath shinde and uddhav thackeray Saam TV
Published On

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पैठणमधील जाहीर सभेत भाषण केलं. सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. रोखठोकमधून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणजे साबणाचे बुडबुडे असल्याची टीका केली पण, त्याच साबणाच्या बुडबुड्याने तुमची मस्त धुलाई केली. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळणे. मी एकदा शब्द दिला की माझं देखील ऐकत नाही. संदिपान भुमरे मला म्हणाले सत्तेतील घटकपक्षांकडून मुस्कटदाबी होत आहे. काय करायचं पुढच्या निवडणुकीत हातावर मोजण्याएवढे पण आमदार येणार नाहीत.

पाहा व्हिडीओ -

राज्यातील जनतेला प्रॉब्लेम आहे. काहीतरी करायला हवं पण भुमरे असं काही करायला तयार होतील वाटलं नव्हते. मात्र, हा जबरदस्त धाडशी माणूस निघाला, संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) लोकप्रिय नेते आणि जसे सगळे लोकं सांगतात त्याप्रमाणे दिलेला शब्द पाळणारे निघाले असंही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण बाहेर असताना सगळे जण आपला कार्यक्रम करायला तयार होते. पण माझ्याबरोबर व्यासपीठावर असणारे सगळ्यांना पुरुन उरले. या ५० आमदारांनी सत्ता सोडली, एखादा सरपंच, नगरसेवक देखील सत्ता सोडत नाही. विचार करत बसतो. मात्र, इथे ५० आमदारांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला.

Eknath shinde and uddhav thackeray
भास्कर जाधवांची बंडखोर आमदारांवर जहरी टीका; म्हणाले, गद्दारांनो बापाच्या नावाच्या जागी...

आमच्या पाठीशी लाखो लोकांचा दुवा होता. शिंदे साहेब तुम्ही अडीच वर्षाचा वनवास संपवला तुम्ही चांगला निर्णय घेतला. अडीच वर्ष नैराश्य पसरलं होतं. पण आम्ही सांगितलं लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या, कोणत्याही सणांवर निर्बंध नकोत लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही सेना-युतीचं सरकार स्थापण केलं आहे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Eknath shinde and uddhav thackeray
सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले, मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त...

मी ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी लोकं आतुरतेने वाट पाहत असतात. सर्वांना वाटतंय हा आपला माणूस आहे. रात्री ३ ते ४ वाजता विकत माणसं येऊ शकत नाहीत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी घेतलेला निर्णय त्यांना पसंत पडला आहे. तसंच लोकांना मी त्यांच्यातला वाटतो आपला वाटतो म्हणून ते माझ्यासोबत फोटो काढतात. आता काही लोकांच्या आजूबाजूला लोक फिरकत नाहीत, पण मी त्यांना आपला माणूस वाटतो तेंव्हाच लोकं येतात असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com