Kalyan Raite River youth drowns Saam Tv News
महाराष्ट्र

Kalyan News : बहिणीकडे कामानिमित्त आला, कपडे धुण्यासाठी तिच्यासोबत नदीवर गेला; पाय घसरल्याने भावाचा बहिणीसमोरच अंत

Kalyan Youth Drowns in Raite River : कल्याणजवळील रायते पुलाजवळ उल्हासनदीत एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. तो आपल्या बहिणीकडे काही कामानिमित्त आला होता.

Prashant Patil

ठाणे (कल्याण) : कल्याणजवळील रायते पुलाजवळ उल्हासनदीत एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. भाऊसाहेब बारस्कर असं या मयत तरुणाचं नाव आहे. भाऊसाहेब रायते येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीकडे एका कार्यक्रमानिमित्त आला होता. साडेबारा वाजता सुमारास बहिणीसोबत रायते पुलाजवळील नदीत कपडे धुण्यासाठी गेला. नदीच्या काठावरच पाय घसरल्याने पाण्यात पडला आणि बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची प्राथमिक माहीती आहे.

घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोधकार्य करत साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधून काढला. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

कल्याण जवळील रायते नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

दरम्यान, बीडमध्ये देखील अशीच काहीशी घटना उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यातील धावडी गावात एकाच दिवशी दोन दुर्दैवी घटना घडल्या आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला असून या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे. यात एका घटनेत एकाने आत्महत्या केली. तर दुसरा युवक तलावात पोहण्यासाठी गेला असताना बुडाला असून गावकरी त्याचा शोध घेत आहेत.

पहिल्या घटनेत, सुट्टी असल्याने गावापासून जवळच असलेल्या तलावावर मित्र मित्र दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. धावडी येथील चौघे मित्र केंद्रेवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. सर्व मित्र पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अंकुर राजाभाऊ तरकसे (वय १८) हा खोल पाण्यात गेल्याने तो परत वर आलाच नाही. मित्रांनी त्याचा शोध घेतला असता सापडून आला नाही.

बीड जिल्ह्याच्या धावडी गावात या घटना काल घडल्या आहेत. या घटनांमुळे गावात चूल देखील पेटली नाही. दुसऱ्या घटनेत, यातील अंबाजोगाई शहरालगत असलेल्या रिंगरोड जवळील शेतामध्ये एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रामधन उर्फ करण अशोकराव नेहरकर (वय २५, रा. धावडी, ता. अंबाजोगाई) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने एका ढाब्याच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील बाबळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT