'त्यानं माझ्या कंबरेखाली...' इंटिमेट सीनदरम्यान अभिनेत्याचं संतापजनक कृत्य, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग

Bollywood Actress On Intimate Scene : बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंटिमेट सीनदरम्यानचा प्रसंग सांगितला आहे. अनुप्रिया म्हणाली की, 'हा असा प्रकार दोनदा घडला आहे.
'त्यानं माझ्या कंबरेखाली...' इंटिमेट सीनदरम्यान अभिनेत्याचं संतापजनक कृत्य, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग
Saam Tv News
Published On

मुंबई : सिनेमांमध्ये इंटिमेट सीन्स असतात. बऱ्याचवेळा असे सीन्स करताना अभिनेते आणि अभिनेत्रींना विचित्र अनुभव येतात. काही कलाकार याबद्दल मुलाखतींमध्ये भाष्य करतात. अशातच आता एका अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान तिला आलेला इंटिमेट सीनचा विचित्र अनुभव सांगितला आहे. शूटिंगच्या बहाण्याने अभिनेत्याने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंटिमेट सीनदरम्यानचा प्रसंग सांगितला आहे. अनुप्रिया म्हणाली की, 'हा असा प्रकार दोनदा घडला आहे. एकदा तर मी असं म्हणणार नाही की, तो माणूस माझा फायदा घेत होता. पण त्याने एक्साइटमेंटमध्ये हे कृत्य केलं. मला दिसत होतं की, तो उत्साहित होत होता, जे व्हायला नको होतं. मग अशावेळी तुम्हाला नक्कीच थोडं अपमानित आणि अस्वस्थ वाटतं.

'त्यानं माझ्या कंबरेखाली...' इंटिमेट सीनदरम्यान अभिनेत्याचं संतापजनक कृत्य, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग
Race 4: आता पडणार पैशांचा पाऊस ! सैफ अली खानचे 'रेस ४'मध्ये कमबॅक

अनुप्रिया पुढे म्हणाली की, 'एका सीनदरम्यान मी असे कपडे घातले होते जे मला कम्फर्टेबल वाटत नव्हते. मला आशा होती की, माझ्यासोबतचा अभिनेता, एक पुरूष असल्याने, हे तो जाणून घेईल की अशा सीनमध्ये स्त्रीला कंबरेला धरणं सोपं आहे. पण त्याने जवळजवळ माझ्या नितंबावर हात ठेवला, जे फारच धक्कादायक होतं. तो माझ्या कमरेवर हात ठेवू शकला असता'.

'नंतर मी त्याचे हात थोडे खाली कंबरेपर्यंत घेतले आणि त्याला खाली नाही तर कंबरेला धरायला सांगितलं. पण त्या क्षणी मी त्याला विचारू शकले नाही की त्याने असं का केलं. कारण तेव्हा तो म्हणाला असता की ते चूकुन झालं होतं. मी त्यावेळी त्याला सांगू शकले नाही. पण पुढच्या वेळी मी त्याला सांगितलं, की हे करू नको'. असं अनुप्रियाने सांगितलं.

'त्यानं माझ्या कंबरेखाली...' इंटिमेट सीनदरम्यान अभिनेत्याचं संतापजनक कृत्य, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग
Yuvraj Singh biopic: युवराज सिंगवर लवकरच बायोपिक येणार; निर्माते लागले कामाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com