Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

Kalyan News : कल्याण स्टेशन समोरील जुन्यी एसटी स्टँड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसीत करण्याचे काम सुरु आहे. हे काम एका खाजगी कंपनीला दिले आहे.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: भंगार चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण बसस्थानक परिसरात घडली आहे. या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी खाजगी कंपनीच्या चार सुरक्षा रक्षकांना अटक करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण (Kalyan) स्टेशन समोरील जुन्यी एसटी स्टँड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसीत करण्याचे काम सुरु आहे. हे काम एका खाजगी कंपनीला दिले आहे. बसस्थानकाच्या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. काही दिवसापासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले होते. यामुळे सुरक्षा रक्षक पाळत ठेवून त्या चोरट्याच्या मागावर होते. दरम्यान दोन दिवसापूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी (Police) घटनास्थळी जात तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत मृतदेह शवच्छेदनासाठी पाठवला. 

तरुण कोण आहे? त्याच्या मृत्यूचे कारण याचा तपास महात्मा फुले पोलिसांकडून करण्यात येत होता. या प्रकरणी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु (Crime News) असताना महात्मा फुले पोलिसांनी बसस्थानक परिसरातील विकास कामावर देखरेखीसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्या मृत तरुणाने भंगार चोरले होते म्हणून त्याला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. (Kalyan Crime) या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. राजू सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी सुरक्षा रक्षक इम्रान शेख, परमेश्वर धाहिजे, लहू धाडी आणि कृष्णा साबळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

राज्यात आणखी एक 73.4 कोटींचा महाघोटाळा; बीडमधील महसूल विभागात खळबळ

Sandwich Recipe: तव्यावर बनवा झटपट ग्रील सँडविच, संध्याकाळचा नाश्ता होईल भारी

Shocking News: एक्स गर्लफ्रेंडची छेड काढली, नंतर जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न; तरुणीने तरुणाच्या जीभेचा तुकडाच पाडला

Mumbai : मुंबईतील चारकोप बिहार होतोय, गोळीबाराच्या घटनेत वाढ; मनसेचा थेट पोलिसांना इशारा, म्हणाले...

SCROLL FOR NEXT