Kalyan Accident Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Accident : भरधाव कारची रिक्षाला धडक; कल्याणमधील घटना, रिक्षा चालक जखमी

Kalyan News : अचानक समोरून येणाऱ्या भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक शैलेश ढोणे हे गंभीर जखमी झाले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: एका भरधाव करणे रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात घडली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाय रिक्षाचे देखील नुकसान झाले आहे. 

कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील खडकपाडा बारावे गावात शैलेश ढोणे हे कुटुंबासह राहतात. दरम्यान २३ जूनला रात्रीनऊ वाजण्याच्या सुमारास शैलेश ढोणे हे रीक्षा घेऊन घराच्या दिशेने जात होते. यावेळी अचानक समोरून येणाऱ्या भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) रिक्षा चालक शैलेश ढोणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात रिक्षाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कार चालकाला घेतले ताब्यात 

याप्रकरणी खडकपाडा पोलिसांना (Khadakpada Police) तक्रार नोंदवण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी गाडीचा नंबर प्लेटवरून गाडी मालकाचा शोध घेत गाडी चालक मुकेश तरे याला ताब्यात घेत कर देखील तप्त केली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या मेळघाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात,दोन मजुरांचा मृत्यू

Haldi Yellow Saree Designs: हळदीला नव्या नवरीने ट्राय करा या सुंदर ट्रेंडी पिवळ्या साड्या, पाहा ७ युनिक डिझाईन्स

SCROLL FOR NEXT