...तर काकडी गावचे ग्रामस्थ ठोकणार शिर्डी विमान तळाला कुलूप! Saam TV
महाराष्ट्र

...तर काकडी गावचे ग्रामस्थ ठोकणार शिर्डी विमान तळाला कुलूप!

...तर काकडी गावचे ग्रामस्थ ठोकणार शिर्डी विमान तळाला कुलूप!

गोविंद साळुंखे

शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) शेजारी असलेल्या काकडी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी लगतच्या असणाऱ्या गावांचे स्मार्ट सिटी करण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. शिर्डीतील काकडी ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र पंधराशे एकर विमानतळाला जमीन देऊन तीन वर्षे उलटून गेली असतानासुद्धा ग्रामस्थांना मात्र आश्वासन दिली जात आहे.

शिर्डी विमानतळाच्या परिसरातील गावे विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसवण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रतील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी बसवावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

शिर्डी विमानतळ तयार होताना कवडीमोल दराने आम्ही आमच्या जमिनी दिल्या मात्र आज विमान प्राधिकरण आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. काकडी ग्रामपंचायतचा थकलेला साडेपाच कोटी रुपयांचा कर अजूनही दिला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय जर पंधरा दिवसात ग्रामपंचायतचा विमानतळा कडून येणारा थकीत कर मिळाला नाही तर विमानतळाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा काकडी ग्रामस्थांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल काही काळासाठी बंद राहणार

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT