कागलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष होणार
ठाकरेसेनेच्या उमेदवार शारदा नागराळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
ठाकरेंच्या उमेदवारानं शिंदेसेनेला पाठिंबा का दिला?
मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजितसिंह घाटगे या कट्टर विरोधकांमध्ये झालेल्या युतीनं कागल नगरपरिषद निवडणुक चांगलीच चर्चेत आली. आता मतदानाला काही तास बाकी असताना ठाकरेसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शारदा नागराळे यांनी निवडणुकीतून माघार घेत. थेट शिंदेसेनेच्या युगंधरा घाटगे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. दरम्यान कागलमध्ये उमेदवारानं परस्पर पाठिंबा दिल्यानं ठाकरेसेना आक्रमक झालीय. कागल नगरपालिका निवडणुकीत पैशांचा वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरेसेनेने केलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागलच्या निवडणुकीकडे अनेकाचं लक्ष होतं. मात्र ठाकरेसेनेच्या शारदा नागराळे यांनी माघार घेतल्यानं आता कागलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष होणार आहे. त्यातही शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या तर ठाकरेसेना शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्यानं या अभद्र राजकीय युतीची चर्चा राज्यात सुरु आहे. एकीकडे कट्टर विरोधक म्हणून एकमेंकासमोर उभं राहायचं आणि निवडणुकीच्या तोंडावर एकमेंकाना पाठिंबा देऊन मतदारांच्या मतांची थट्टा उडवायची, हा खेळ लोकशाहीचे धिंडवडे काढण्यासारखाच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.