Raj Thackeray reacts sharply to Union Minister Jitendra Singh’s controversial statement on Mumbai saam tv
महाराष्ट्र

'मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव'; जितेंद्रसिंह बरळले, राज ठाकरे संतापले

Raj Thackeray Slams Union Minister: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिह यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा मुंबई आणि मराठीवरून वाद निर्माण झालाय. केंद्रीय मंत्री नेमकं काय म्हणाले? राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांसह सत्ताधारी भाजपचा कसा समाचार घेतलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानामुळे मुंबई–गुजरात वाद पुन्हा तापला.

  • हे विधान मराठी अस्मितेला धक्का देणारे असल्याने विरोध वाढला.

  • राज ठाकरेंनी मंत्री आणि भाजपवर जोरदार टीका केली.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह याचं हे विधान नीट ऐका. मुंबईतील मराठी माणसाला डिवचणारं हे विधान आयआयटी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सिंह यांनी केलयं. आधीच राज्यात मराठी - हिंदीवरून वादाची ठिणगी पडलीय. त्यात केंद्रीय मंत्र्यांनी आगीत तेल ओतत मराठी माणसाची दुखती नस दाबली. ज्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्याचा डाव हाणून पाडल्यानं दशकांची पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात झालीय, अशा शब्दात राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांचा समाचार घेतलाय.

मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावलाय. मराठी मुंबई, महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दल गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरूवात केलीय. खरंतर जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.

मुंबई नको बॉम्बेच हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरूय. आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMRपरिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो. आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं. ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधल्यानं आता भाजपही आक्रमक झालीय. मुळात भाजपनंच बॉम्बेचं मुंबई केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न अनेकदा परप्रांतीय आणि त्यांच्या आकांकडून राज्यात केला जातो.

अशात आयआयटी बॉम्बेच्या नावावरून चिमटा काढण्याचा खोडसाळपणा केंद्रीय मंत्र्यांनी का केला? केंद्रातल्या मंत्र्यांना मुंबई आणि मराठी माणसाचा इतका द्वेष कशासाठी? विशेष म्हणजे एकीकडे अमित शाह देशी भाषांचा वापर करा असा आग्रह धरतात. आणि दुसरीकडे त्यांचेच मंत्री इंग्रजांच्या बॉम्बे नावाची गुलामगिरी कशासाठी करतात हा खरा सवाल आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

Ticket To Finale Winner: 'या' स्पर्धकाची BB19 च्या ग्रँड फिनालेमध्ये डायरेक्ट एन्ट्री; मिळाली खास पॉवर

Protein Shake Recipe : घरच्या घरी हेल्दी चॉकलेट प्रोटीन शेक बनवण्याची सोपी रेसिपी

'आयुष्यात पोकळी..' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची भावनिक पोस्ट, मन केले मोकळे

Crime : २ कोटींची लाच मागितल्याने निलंबन, पण PSI काही सुधारला नाही, पैसे डबल करून देतो सांगितलं अन्...

SCROLL FOR NEXT