Jejuri Saam TV
महाराष्ट्र

Jejuri Khandoba Temple: जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिने दर्शनासाठी बंद; कारण काय?

Jejuri Khandoba Fort News: जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Jejuri News: जेजुरीच्या खंडोबारायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्वाची बातमी. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ( २८ ऑगस्ट ) दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळामध्ये गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून दोन्हीही गाभाऱ्यात जाता येणार नाही.

खंडोबा गडावर (Khadoba Fort) महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहेत. गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना करण्यात येणार असून या विकास कामांसाठी १०७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे.

या काळात भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. दरम्यान, खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकास कामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी- मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT