Jejuri Saam TV
महाराष्ट्र

Jejuri Khandoba Mandir: जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा दीड महिन्यांनी दर्शनासाठी खुला; गडावर भाविकांची अलोट गर्दी

मंगेश कचरे

Jejuri Khandoba Mandir:

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. खंडोबा गडावर दुरूस्तीच्या कामामुळे मुख्य गाभाऱ्याचे दर्शन गेल्या दीड महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. हे मंदिर दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने शनिवारपासून (२१, ऑक्टोंबर) मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा गेल्या दीड महिन्यांपासून बंद होता. दुरूस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

खंडोबा गडावर (Khadoba Fort) महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू होती. त्यामुळे भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आले होते. हे दुरूस्तीचे काम पुर्ण झाल्याने आता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दीड महिन्यांपासून मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद असल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर घटली होती. आता पुन्हा मंदिर सुरू होत असल्याने दसऱ्यानंतर भाविकभक्तांची गर्दी पुन्हा वाढणार आहे. मंदिर प्रशासनाकडून दसऱ्याचीही जय्यत तयारी करण्यात आली असून आकर्षक रोषणाईच्या झगमगाटाने मंदिर उजाळून निघाले आहे.

एकविरा देवीचे मंदिर चोवीस पुढील २ दिवस २४ तास खुले राहणार....

आई एकविरा देवीच्या (Ekvira Devi Temple) भाविकांसाठीही एक आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचे मंदिर आजपासून सप्तमीच्या महानवमीपर्यंत चोवीस तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. याबाबतची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT