ED,CBI इन्कम टॅक्स, हे भाजप चे कार्यलय बनलं असल्याचं जयंत पाटलांच वक्तव्यं !
ED,CBI इन्कम टॅक्स, हे भाजप चे कार्यलय बनलं असल्याचं जयंत पाटलांच वक्तव्यं ! SaamTV
महाराष्ट्र

ED,CBI इन्कम टॅक्स, हे भाजप चे कार्यलय बनलं असल्याचं जयंत पाटलांच वक्तव्यं !

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : ED, CBI , इन्कम टॅक्स हे आता भाजप चे कार्यलय BJP Office झाले आहे. या एजन्सी फक्त आघाडी च्या नेत्यावर कारवाई करतात. भाजपच्या एका नेत्यावर कारवाई केली जात नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी आज भाजप आणि तपास यंत्रणावरती केली आहे. (Jayant Patil's statement that ED, CBI Income Tax has become the office of BJP)

हे देखील पहा -

महाराष्ट्र सरकार Maharashtra Goverment पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मागे उभे राहत आहे. पण केंद्र सरकारचा Central goverment शेतकऱ्यांना Farmers मदत देण्यामध्ये आतापर्यंत कसलाही सहभाग नाही. याचा आम्हाला खेद वाटतो. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दिल्या जाणाऱ्या मदतीवरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रावर टीका केली आहे. ते सांगलीच्या तासगाव मध्ये बोलत होते.

महाराष्ट्र मधील वेगवेगळ्या भागांत तीन वेळा अतिवृष्टी Heavy Rain झाली, पण केंद्र सरकारचं पथक नुकसान पाहणी करण्यासाठी खूप उशिरा आलं. केंद्र सरकारच्या मदतीची आणखी किती वेळ वाट पाहणार? तोवर राज्य सरकारला  जितकी मदत करणे शक्य आहे तितकी मदत सरकार करेल असंही पाटील म्हणाले. तसंच ED, CBI , इन्कम टॅक्स हे आता भाजप चे कार्यलय झाले आहे. या एजन्सी फक्त आघाडी च्या नेत्यावर कारवाई करतात. भाजपच्या एका नेत्यावर कारवाई केली जात नाही असंही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील ८ तालुक्यातील पाणी नमुने दूषित; २५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

Amruta Khanvilkar : तुला पाहून जग विसरायला होतं; अमृताचा 'नो फिल्टर'लूक चर्चेत

Today's Marathi News Live : पुण्यात घोरपडीत परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

HSC Result 2024 : बारावीत यंदाही कोकण विभागाची बाजी, मुंबईचा निकाल सर्वात कमी; वाचा निकालाची ५ महत्वाची वैशिष्ट्ये

IPL 2024, Qualifier 1: KKR vs SRH सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT