Sanjay Raut | शिवसेनेची सत्ता स्वबळावरच आणायची; संजय राऊतांच मोठं विधान !

मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत त्या येतील आणि जातील त्यावर आपला भगवा फडकतच राहील
Sanjay Raut | शिवसेनेची सत्ता स्वबळावरच आणायची; संजय राऊतांच मोठं विधान!
Sanjay Raut | शिवसेनेची सत्ता स्वबळावरच आणायची; संजय राऊतांच मोठं विधान!Saam TV

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या BMC पार्श्वभूमीवरती संजय राऊतांनी आज मोठं विधानं केलं आहे. संपूर्ण मुंबईत आपला बालेकिल्ला आहे. भगवा झेंडा खांद्यावर घेऊन बाळासाहेबांच्या विचारांच्या दृष्टीने मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. शिवसेनेची लाट shivsena कायम असते असते म्हणत त्यांनी फक्त शिवसेनेची सत्ता स्वबळावर आणण्याच वक्तव्यं आज केलं आहे.(Sanjay Raut's statement to bring Shiv Sena to power on its own)

हे देखील पहा -

शिवसेना काय करते असं विरोधी पक्ष Opposition Party नेहमी बोलत आहेत याचं एक चावी विरोधी पक्षांना दिली पाहिजे महाराष्ट्र मध्ये काम करण्याची चावी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. देशामध्ये 32 राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Maharashtra CM कामाच्या बाबतीत पहिल्या पाचमध्ये आले आहेत तसंच सेनेचे मुख्यमंत्री झाल्यापासून कुणाच्या पोटात जळजळ मळमळ होत असेल तर ते होऊ दे त्याला इलाज नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Sanjay Raut | शिवसेनेची सत्ता स्वबळावरच आणायची; संजय राऊतांच मोठं विधान!
मुंबई पुन्हा हादरली; डिलिव्हरी बॉयचे 6 वर्षीय चिमुकलीसोबत विकृत कृत्य

दरम्यान आपण काल राहुल गांधींना Rahul Gandhi भेटलो दिल्लीत सगळ्यांनाच शिवसेनेवर बोलावसं वाटतं आणि ते वारंवार मला विचारतात की शिवसेनेच्या यशाचं रहस्य काय आहे. शिवसेना वादळामध्ये संकटामध्ये मग ते ED असो वा CBI असो ती टीकते आणि आम्हाला त्याची परवा नाही आम्ही फक्त काम करतो असही ते म्हणाले. तसेच कुणीही कितीही काड्या खालून लावल्या तरी त्याला आग लागणार नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुका BMC Elections जवळ आल्या आहेत त्या येतील आणि जातील त्यावर आपला भगवा फडकतच राहील असा विश्वास देतच त्यांनी फक्त आणि फक्त शिवसेनेची सत्ता ही स्वबळावर आपल्याला आणायची आहे असं आवाहन शिवसैनिकांना केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com